तालुक्याने ओलांडले कोविड बाधितांचे चोविसावे शतक! संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही विक्रमी रुग्णांची भर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यावर घोंगावणारे कोविडचे संक्रमण दिवसागणिक अधिक गहिरे होत चालले आहे. दररोज एकमेकांशी स्पर्धा करणारी वाढती रुग्णसंख्या आणि त्यात मृतांचाही चढता आलेख तालुक्यात पसरलेल्या कोरोना प्रादुर्भावाची दाहकता दाखवणारी ठरत आहे. गेल्या दोन दिवसात काहीशा मंदावलेल्या रुग्ण संख्येने आज मात्र पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आजही शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील आठ रुग्णांसह तालुक्यातील 74 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याने अडिचाव्या सहस्रकाच्या दिशेनेही मोठे पाऊल टाकले आहे. आजही रूग्णसंख्येत 82 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांचा आकडा 2 हजार 467 वर जाऊन पोहोचला आहे.
आजही शासकीय व खासगी प्रयोग शाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील गणेशनगर परिसरातील 40 वर्षीय महिला, मालदाड रोड परिसरातील 59 वर्षीय इसमासह 34 वर्षीय तरुण व 24 वर्षीय महिला, पाबळे वस्ती येथील 42 वर्षीय तरुण, स्वामी कॉलनीतील 52 वर्षीय महिला, जानकीनगर परिसरातील 60 वर्षीय महिला, संगमनेर मधील 49 वर्षीय व कुरण रोड परिसरातील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजच्या अहवालातून ग्रामीण भागातील निमोण, धांदरफळ खुर्द, सादतपूर, साकुर, सावरगावतळ व गुंजाळवाडी परिसरातून दोन पेक्षा अधिक प्रमाणात रुग्ण समोर आले आहेत.
तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरातील चाळीस वर्षीय तरुणासह एक तीस वर्षीय महिला, शिबलापुर मधील पंधरा वर्षीय तरुणी, निमोण मधील 55 वर्षीय इसमासह 49 व 38 वर्षीय महिला, तसेच आठ वर्षीय मुलगा, सोनेवाडी येथील 63 वर्षीय इसमासह 49 व 24 वर्षीय महिला, शिरापूर येथील 52 वर्षीय महिला, पेमगिरी येथील 68 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्द मधील 59, 55, 50, 27 व 26 वर्षीय महिला व 9 वर्षीय बालिका, सादतपुर मधील 38 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय तरुणी व 18 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 43 वर्षीय तरुण, वडगाव पान मधील 36 वर्षीय महिला व 43 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 62 वर्षीय इसम,
आंबी दुमाला येथील 60 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 70 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 61 व 54 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 21 वर्षीय तरुण, खळी येथील 45 वर्षीय तरुणासह 38 वर्षीय महिला, निळवंडे येथील 27 वर्षीय तरुण, प्रतापपुर येथील 34 वर्षीय महिला, मुंजेवाडी येथील 45 वर्षीय महिला, झोळे येथील 27 व 29 वर्षीय तरुण तसेच 49 व 26 वर्षीय महिला, साकूर मधील 60 वर्षीय इसमासह 40 वर्षीय तरुण, 30 28 व 23 वर्षीय महिला व तीन वर्षीय बालक, चिखली येथील तेवीस वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 47 वर्षीय इसम,
गुंजाळवाडी शिवारातील 70 व 50 वर्षीय इसमासह 42, 27, 26 व 25 वर्षीय तरुण, 65, 46, 45, 32, 22 वर्षीय महिला व बारा वर्षीय बालिका, जोर्वे येथील 37 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरुण व 10 वर्षीय बालक, डिग्रस येथील 28 वर्षीय तरुण, सावरगाव तळ मधील 75 व 50 वर्षीय इसमासह 17 वर्षीय तरुण, 70 व 45 वर्षीय महिला, कौठे खुर्द मधील 22 वर्षीय तरुणी व हिवरगाव पावसा येथील पंचवीस वर्षीय तरुणासह ग्रामीण भागातील 74 आणि शहरी भागातील आठ असे एकत्रित 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संगमनेर तालुक्याच्या रूग्ण संख्येत आजही विक्रमी बाधितांची भर पडून तालुक्याची रुग्णसंख्या चोविसावे शतक ओलांडीत अडिचाव्या सहस्त्रकाच्या दिशेने मोठे पाऊल टाकून पुढे गेली आहे. आजच्या रुग्ण संख्येमुळे तालुक्यातील बाधितांची संख्या 2 हजार 467 वर पोहोचली आहे. तर तालुक्यात आत्तापर्यंत 36 जणांचा बळीही गेला आहे. अर्थात यातील चौघांचे मृत्यू अद्यापही शासकीय यादीत कोविड मृत्यु म्हणून गणले गेले नसल्याने तालुक्यातील अधिकृत मृत्यु 32 आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या २७ हजार ६७२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ८४.०९ टक्के आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज रात्री दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात ७४४ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ७२२ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८ आणि अँटीजेन चाचणीत ४६७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हाभरात ६८१ रुग्णांना देण्यात आला आज डिस्चार्ज..
अहमदनगर महापालिका क्षेत्र १३३, संगमनेर ६१,
राहाता ५२, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ४०, श्रीरामपूर २९, लष्करी परिसर २२, नेवासा ६८, श्रीगोंदा १९,
पारनेर ४०, अकोले ३१, राहुरी २६, शेवगाव ३४,
कोपरगाव २०, जामखेड ३३, कर्जत २७, लष्करी रुग्णालय १७ आणि इतर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
- जिल्ह्यात उपचार सुरू असलेले एकूण रुग्ण : ४ हजार ७२२..
- जिल्ह्यात आजवर झालेले एकूण मृत्यू : ५१३..
- जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या : ३२ हजार ९०७..
- आतापर्यंत २७ हजार ६७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले..
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ८४.०९ टक्के..
- जिल्ह्यात आज नव्याने ७४४ रुग्णांची भर..