संगमनेर तालुक्यातील शहरी रुग्णसंख्येचा सरासरी दर मंदावला! ग्रामीणभागातील रुग्णवाढ मात्र चिंताजनक; सक्रीय रुग्णांची संख्याही चौदाशे पन्नास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाची गती गेल्या दोन दिवसांपासून काहीशी स्थिरावली असून आजही त्यात सातत्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे एकीकडे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोविडचा उद्रेक होत असतांनाही संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील ग्रामीणभागात वाढत चाललेला संसर्ग मात्र दिवसोंदिवस वाढतच असून शहरी रुग्णगती मात्र आजही ओहोटीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. गेल्या काही दिवसांनंतर आज पहिल्यांदाच समोर आलेल्या रुग्णांपेक्षा उपचार पूर्ण करुन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्याही आज किंचित अधिक असल्याने संगमनेरकरांना हा देखील दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यातील 136 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील अवघ्या 22 जणांचा समावेश आहे. आज 139 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले असून सक्रीय रुग्णांची संख्या आता 1 हजार 453 झाली आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 10 हजार 700 वर पोहोचली आहे.


गेल्या पाच दिवसांपासून कोविडने जिल्ह्यात अक्षरशः उच्चदाद मांडला असून अहमदनगर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, कर्जत, राहुरी, पाथर्डी, अकोले व शेवगाव या तालुक्यांनी अवघ्या चौदा दिवसांतच एक हजारांपेक्षा कितीतरी अधिक रुग्णसंख्या ओलांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर महापालिका क्षेत्राच्या खालोखाल रुग्णवाढ होणार्‍या संगमनेर तालुक्याला मात्र काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र असून सुरुवातीला दुसर्‍या क्रमांकाची संगमनेरची जागा राहाता तालुक्याने पटकाविल्यानंतर आता तिसर्‍या क्रमांकाच्या जागेवरुनही तालुका मागे सरकला असून ती जागा आता कोपरगावने घेतली आहे. कालपर्यंत चौथ्या स्थानावर असलेल्या श्रीरामपूर तालुक्यात आज रुग्णसंख्या कमी झाल्याने संगमनेर तालुका पुन्हा चौथ्या स्थानावर आला आहे.


आज शासकीय प्रयोगशाळेच्या अवघ्या तीन, खासगी प्रयोगशाळेच्या 88 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 45 अशा संगमनेर तालुक्यातील एकूण 136 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर शहरातील 22, ग्रामीणभागातील 113 व पोहेगाव (कोपरगाव) येथील एक अशा एकूण 136 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. शहरातील जय जवान चौकातील 50 वर्षीय इसम, जनता नगरमधील 32 वर्षीय तरुण, ज्ञानेश्‍वर गल्लीतील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 व 35 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय मुलीसह एक वर्षीय बालक, शिवाजी नगरमधील 75, 45 व 38 वर्षीय महिलेसह 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सावता माळीनगरमधील 48 वर्षीय इसमासह 17 वर्षीय तरुण, नाशिक रस्त्यावरील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 53 वर्षीय महिला, देवाचा मळ्यातील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 48 वर्षीय महिला, नवीन नगर रोडवरील आठ वर्षीय बालक, इंदिरा नगरमधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, भारत नगरमधील 34 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 82 वर्षीय वयोवृद्धासह 22 वर्षीय तरुण.


ग्रामीण भागातील देवकौठे येथील 30 वर्षीय तरुण, तिगांव येथील 22 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 51 वर्षीय इसमासह 29 वर्षीय महिला, काकडवाडीतील 45 वर्षीय इसम, पिंपळदरीतील 42 वर्षीय तरुण, डोळासणे येथील 40 व 19 वर्षीय तरुण, खंदरमाळ येथील 12 वर्षीय मुलगी, अकलापूर येथील 30 वर्षीय तरुणासह 26 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 59 व 56 वर्षीय इसमांसह 30 वर्षीय तरुण, कर्जुले पठार येथील 56 वर्षीय इसम, कोठे बु. येथील 18 वर्षीय तरुण, आश्‍वी बु. येथील 73 व 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 40 वर्षीय तरुण व 60 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील एक वर्षीय बालक, नांदुरी दुमाला येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, देवगाव येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, प्रतापपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 11 वर्षीय मुलगा,


मेंढवण येथील 67 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम, निमज येथील 50 वर्षीय महिला, ओझर बु. येथील 65 व 45 वर्षीय महिलांसह 22 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 24 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 45 वर्षीय इसम, चिंचपूर येथील 65 वर्षीय महिला व 32 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 48 वर्षीय इसमासह 33 व 23 वर्षीय तरुण व 18 वर्षीय महिला, कोल्हेवडी येथील 45 वर्षीय महिला व 32 वर्षीय तरुण, निंभाळे येथील 58 वर्षीय इसम, आश्‍वी खुर्द मधील 41 वर्षीय तरुण व 30 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 80 वर्षीय ज्येष्ठासह 51 वर्षीय इसम, उंबरी बाळापूर येथील 46 वर्षीय इसमासह 10 वर्षीय मुलगा, वाघापूर येथील 50 वर्षीय इसम, शेंडेवाडी येथील 45 वर्षीय इसम, निळवंडे येथील 66 वर्षीय महिला, खंडेरायवाडीतील 23 वर्षीय तरुणासह एक वर्षीय बालक, घोटेवाडीतील 68 वर्षीय महिला,


रायतेवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगा, निमोण येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 35 वर्षीय तरुण, सादतपूर येथील 36 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, निमगांव बु. येथील 40 वर्षीय महिला व 38 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 49 वर्षीय इसम, 41 वर्षीय तरुण, 57 वर्षीय महिलेसह 19 व 18 वर्षीय तरुणी व 14 वर्षीय मुलगा, राजापूर येथील 49 वर्षीय इसमासह 40 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 35 व 21 वर्षीय महिलांसह 16 वर्षीय तरुण व पाच वर्षीय बालिका, नान्नज दुमाला येथील 21 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 90 वर्षीय वयोवृद्धासह 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 47 वर्षीय इसम व 40 आणि 20 वर्षीय तरुण, रहाणे मळ्यातील 39 वर्षीय महिला व बारा वर्षीय मुलगा, गोल्डन सिटीतील 34 वर्षीय तरुण,


दरेवाडीतील 40, 30 व 21 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 30 वर्षीय महिला, डिग्रस मालुंजे येथील 22 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 25 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुण, सहा वर्षीय बालक व तीन वर्षीय बालक, वरुडी पठार येथील 45 वर्षीय इसम, रणखांब येथील 26 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 19 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 53 वर्षीय इसमासह 27 व 26 वर्षीय तरुण व 50 वर्षीय महिला, खांजापूर येथील 31 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्दमधील 28 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 52 व 50 वर्षीय इसमांसह 42 व 25 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 34 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 48 व 28 वर्षीय महिला, खांडगावच्या वैदुवाडीतील 22 वर्षीय तरुण व ढोलेवाडीतील 69 वर्षीय महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय पोहेगाव येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावरही संगमनेरात उपचार सुरु आहेत.


जिल्ह्यात आजही उच्चांकी 2 हजार 405 रुग्ण समोर आले आहेत. (कंसात गेल्या 14 दिवसांची एकूण संख्या) अहमदनगर महापालिका क्षेत्र 494 (7005), राहाता 184 (2398), कोपरगाव 289 (1921), संगमनेर 136 (1855), श्रीरामपूर 66 (1839), कर्जत 279 (1712), नगर ग्रामीण 88 (1691), राहुरी 117 (1477), पाथर्डी 177 (1461), अकोले 126 (1373), शेवगाव 168 (1127), पारनेर 121 (992), नेवासा 47 (955), श्रीगोंदा 52 (686) व जामखेड 9 (627). आज जिल्ह्यात 2 हजार 405 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 23 हजार 104 झाली आहे.

संगमनेर तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातील 14 दिवसांतच सरासरी 141 रुग्ण दररोज या गतीने आत्तापर्यंत तब्बल 1 हजार 970 रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील अवघ्या 412 रुग्णांचा तर ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 557 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या स्थितीत शहरी रुग्णवाढीचा सरासरी दर 29.43 असून ग्रामीण क्षेत्राचा सरासरी दर 111.21 आहे. तालुक्यात आजच्या स्थितीत 1 हजार 453 सक्रीय रुग्ण असून आज तालुक्यातील 139 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Visits: 32 Today: 1 Total: 117734

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *