कंटेनरला मालवाहू पिकअपची धडक; एक ठार

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील एकोणावीस मैल येथील बिकानेर हॉटेल समोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून मालवाहू पिकअपने जोराची धडक दिली. यामध्ये झालेल्या अपघातात पिकअपमधील एकजण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी (ता.10) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे येथून मालवाहू पिकअप (क्रमांक एमएच.12, एसएफ. 8133) आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होती. दरम्यान, शनिवारी सकाळी बिकानेर हॉटेल जवळ आली असता तेथे उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात पिकअपमधील शशीकांत शिवाजी वाल्हेकर (वय 28, रा.डोणजे, ता.हवेली, जि.पुणे) हे जागीच ठार झाले. सदर अपघाताची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विशाल कर्पे यांच्यासह डोळासणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला घेण्यात आले. यामध्ये पिकअपचेही मोठे नुकसान झाले आहे.

Visits: 93 Today: 1 Total: 1111705

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *