कठोर निर्बंध लागू असतांनाही जिल्ह्याची सरासरी रुग्णगती वाढली! संगमनेरातील सक्रीय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पार गेल्याने चिंता वाढल्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कठोर निर्बंध लागू असतांनाही अहमदनगर जिल्ह्यातील संक्रमणात कोणताही फरक पडलेला नसून उलटपक्षी जिल्ह्याच्या सरासरीत कालच्या तुलनेत आज वाढ झाली आहे. आजही जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक रुग्ण समोर आले असून अहमदनगर महापालिका क्षेत्रासह संगमनेर, पाथर्डी, राहाता, कोपरगाव, अकोले, कर्जत, श्रीरामपूर व नगर ग्रामीणमधून शंभराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. आज अकोले तालुक्यातही कोविडचा उद्रेक झाला असून तेथून 120 तर संगमनेर तालुक्यात तब्बल 169 रुग्ण आढळले आहेत. आजच्या रुग्णवाढीने जिल्हा 1 लाख 11 हजार 423 रुग्णसंख्येवर तर संगमनेर तालुका 9 हजार 832 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्यात 1 हजार 46 सक्रीय रुग्ण असून आज तालुक्यातील अवघ्या 55 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.


जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची गती दिवसोंदिवस उंचावत असून काल (ता.8) जिल्ह्याचा सरासरी रुग्णवाढीचा वेग 1 हजार 810 रुग्ण प्रतिदिवस होता, त्यात आज वाढ झाली असून आजची सरासरी 1 हजार 833 रुग्ण प्रतिदिवसावर पोहोचली आहे. गेल्या नऊ दिवसांत संगमनेर तालुक्यातही तब्बल 1 हजार 156 रुग्णांची भर पडली असून तालुक्याची सरासरीही आता 128 रुग्ण दररोज या गतीवर गेली आहे. तालुक्यातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पाशर्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या कठोर निर्बंधाचे पालन करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून प्रत्येक नागरिकाने वाढते संक्रमण गांभिर्याने घेण्याची गरज आहे.


आजही जिल्ह्यात उच्चांकी रुग्ण आढळून आले असून शासकीय प्रयोगशाळेच्या 527, खासगी प्रयोगशाळेच्या 579 व रॅपीड अँटीजेनद्वारा 916 जणांसह एकूण 2 हजार 22 जणांने नव्याने कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधीक 526 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रात आढळले असून त्याखालोखाल संंगमनेर 169, पाथर्डी 146, राहाता 146, राहाता 137, कोपरगाव 132, अकोले 120, कर्जत व श्रीरामपूर प्रत्येकी 114, नगर ग्रामीण 113, राहुरी86, जामखेड 70, श्रीगोंदा 60, भिंगार लष्करी परिसर 57, नेवासा 54, शेवगाव 52, पारनेर 43, इतर जिल्ह्यातील 27 व इतर राज्यातील दोघांचा त्यात समावेश आहे.


संगमनेरातही आज उच्चांकी 169 रुग्ण आढळले आहेत. शासकीय प्रयोगशाळेकडून 37, खासगी प्रयोगशाळेकडून 109 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारे 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 131 व अन्य तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. शहरातील अकोले बायपासवरील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 30 वर्षीय तरुण, गणेशनगर मधील 79 वर्षीय वयोवृद्धासह 45 वर्षीय इसम, स्टेट बँक कॉलनीतील 69 वर्षीय महिला, चैतन्य नगरमधील 64 व 26 वर्षीय महिलांसह 42 व 41 वर्षीय तरुण, अकोले नाक्यावरील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 31 वर्षीय तरुण व 26 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 66 वर्षीय दोघे, 61 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 50 वर्षीय इसम व 28 आणि 26 वर्षीय महिला, शिवाजी नगरमधील 41, 38, 33 व 30 वर्षीय तरुण, जनता नगरमधील 53 वर्षीय इसम, कॅप्टन लख्मी चौकातील 44 वर्षीय इसम, मेनरोडवरील 33 वर्षीय महिला, जय जवान चौकातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जेधे कॉलनीतील 18 वर्षीय तरुण, नवीन नगर रस्त्यावरील 70 वर्षीय महिला, वडजे मळ्यातील 45 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता असलेल्या 69 व 67 वर्षीय ज्येष्ठांसह 50 वर्षीय महिलांना कोविडची लागण झाली आहे.


ग्रामीण भागातील मालदाड येथील 22 वर्षीय महिला, नांदुर खंदरमाळ येथील 72 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, बिरेवाडीतील 52 वर्षीय इसम, पेमगिरीतील 31 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 45 वर्षीय इसम, 40 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुण, पिंप्री लौकी येथील 36 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 28 व 24 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 61 वर्षीय महिलेसह गोल्डन सिटीतील 62 व 60 वर्षीय ज्येष्ठांसह 54 वर्षीय महिला, धांदरफळ बु. मधील 40 वर्षीय महिला व 31 वर्षीय तरुण, पळसखेडे येथील 38 वर्षीय तरुण व 33 वर्षीय महिला, खांडगाव येथील 82 व 80 वर्षीय वयोवृद्धासह 48 व 44 वर्षीय इसम व 29 वर्षीय तरुणासह चार वर्षीय मुलगा, मनोलीतील 50 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 64 व 26 वर्षीय 45 वर्षीय इसम व 37 वर्षीय तरुण, एकता चौकातील 67 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुणी, साईश्रद्धा चौकातील 32 वर्षीय तरुण, निर्मल नगर मधील 54 वर्षीय इसम, राजापूर येथील 56 वर्षीय इसमासह 41 व 38 वर्षीय तरुण व 39 व 29 वर्षीय महिला, घारगाव येथील 67 व 43 वर्षीय महिलांसह 55 वर्षीय इसम,


साकूर येथील 47 व 44 वर्षीय इसमांसह 40, 37, 28 व 16 वर्षीय तरुण आणि 46 व 35 वर्षीय महिलांसह सोळा वर्षीय तरुणी, प्रतापपूर येथील 52 वर्षीय इसमासह 41 वर्षीय तरुण व 14 वर्षीय मुलगा, तळेगाव येथील 59, 52 व 50 वर्षीय इसमांसह26 वर्षीय महिला व 23 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 70 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 23 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्द येथील 56 वर्षीय इसमासह 42, 38 व 32 वर्षीय तरुण आणि 65, 55, 35, 30 व 28 वर्षीय महिला, आश्‍वी बु. मधील 88 वर्षीय वयोवृद्धासह 36 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 59 वर्षीय इसमासह 22 वर्षीय दोन महिला, अंभोरे येथील 40, 39, 38 व 35 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 43 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खंदरमाळ येथील 31 वर्षीय तरुण, खांजापूर येथील 35 व 33 वर्षीय तरुणांसह 30 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 67 वर्षीय इसमासह 55 व 54 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 34 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 38 वर्षीय तरुण,


वडगाव लांडगा येथील 60, 40 व 25 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 42 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 40 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 40 व 28 वर्षीय तरुणांसह 25 वर्षीय महिला, खराडी येथील 62 वर्षीय महिला आणि 32 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा 35 व 28 वर्षीय तरुण, शिरापूर येथील 21 वर्षीय तरुण, निमज येथील 28 वर्षीय तरुण व 26 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 39 वर्षीय तरुण, हंगेवाडीतील 45 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 39 तरुण, रहिमपूर 28 वर्षीय तरुण, वडझरी खुर्द येथील 41 वर्षीय महिला, चिकणी येथील 41 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 42 वर्षीय तरुणासह 42 व 35 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालक, चिखली येथील 35 वर्षीय तरुण, सावरचोळ येथील 36 वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील 65 वर्षीय ज्येश्ठ नागरिकासह 21 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 54 वर्षीय इसम, करुले येथील 34 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 28 वर्षीय तरुण, निमोण येथील 43 व 19 वर्षीय तरुण, शिंदोडी येथील 29 वर्षीय तरुण व चिंचोली गुरव येथील 20 वर्षीय तरुण. तसेच श्रीरामपूर येथील 40 वर्षीय महिला, 38 वर्षीय तरुण व 15 वर्षीय मुलगी, अहमदनगरच्या सारसनगरमधील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 57 वर्षीय इसमाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Visits: 208 Today: 2 Total: 1416207

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *