‘धन्वंतरी’मध्ये पत्रकारांना कोविडची लस

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील ‘धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या सहकार्याने आणि संगमनेर पत्रकार मंचच्या पुढाकारातून संगमनेरातील पत्रकारांचे नुकतेच कोविड लसीकरण करण्यात आले.

कोरोना विषाणूंनी पुन्हा कहर केला असून रोज रुग्णसंख्या नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यातच केंद्र व राज्य सरकारने लसीकरण मोहिमेस गती दिली आहे. त्याअंतर्गत कोरोनाचा लढा यशस्वी करण्यासाठी आरोग्य, पोलीस, महसूल, पंचायत यांच्याबरोबर पहिल्या फळीत पत्रकार देखील काम करत आहे. यामध्ये अनेक पत्रकारांचे बळी देखील गेले आहे. तरी देखील पत्रकार कोविडबाबतचे प्रबोधन करण्यासह इत्यंभूत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे. याची दखल घेत धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने पत्रकारांना लस देण्यासाठी संगमनेर पत्रकार मंचने पुढाकार घेतला. यास हॉस्पिटल व्यवस्थापनाने प्रतिसाद देत पत्रकारांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रवीणकुमार पानसरे, डॉक्टर दीपाली पानसरे, कर्मचारी प्रियंका वाळके, नयना रहाणे, विठ्ठल गायकवाड, संगीता दुशिंग, पत्रकार मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी, उपाध्यक्ष नितीन ओझा, सचिव गोरक्षनाथ मदने, आनंद गायकवाड, संजय अहिरे, भारत रेघाटे, विलास गुंजाळ, विकास वाव्हळ, संदीप इटप, अश्विन मुथ्था आदी पत्रकार उपस्थित होते.

लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत ध्नवंतरी हॉस्पिटलमध्ये 45 वर्षापुढील व्यक्तींना कोविशील्ड 374 पुरुष, महिला 266 असे एकूण 640 तर कोव्हॅक्सिन पुरुष 292 व 248 महिला असे एकूण 540 जणांना लस देण्यात आली.
