संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली! सत्तावन्न वाड्यावस्त्यांमध्ये रुग्ण आढळले; पठारभागाची रुग्णसंख्याही फुगलेलीच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही तालुक्यांमधील रुग्णसंख्येच्या कमी-अधिक प्रमाणाने जिल्ह्याचा कोविड रुग्ण फलक सारखा खाली-वर होत असून मंगळवारी खालावलेली रुग्णसंख्या आज पुन्हा वाढली आहे. पारनेर तालुक्यात आज धक्कादायकरित्या रुग्णवाढ नोंदविली गेली असून मंगळवारच्या तुलनेत आज तेथील रुग्णसंख्येत शंभराहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. पारनेरसह आज संगमनेर तालुक्यातूनही जवळपास दिडशे रुग्ण आढळले आहेत. तालुक्याच्या पठारभागातील संक्रमणात अद्यापही घट झालेली नसून तेथील सोळा गावे व वाड्यावस्त्या मिळून आजही 36 रुग्ण समोर आले आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 26 हजार 728 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. तालुक्यात सध्या 943 सक्रीय रुग्ण असून आत्तापर्यंत 414 जणांचा बळी गेला आहे.
गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात एकीकडे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील रुग्णसंख्या खालावत असतांना दुसरीकडे जिल्ह्यातील पारनेरसह संगमनेर, श्रीगोंदा, नगर ग्रामीण, पाथर्डी, नेवासा, जामखेड, शेवगाव या तालुक्यांमध्ये सातत्याने रुग्णसंख्येचा चढ-उतार दिसू लागल्याने जिल्ह्यातील चिंता कायम आहेत. आजच्या अहवालातूनही शेवगाव, कर्जत, राहुरी, कोपरगाव, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातून काहीसा दिलासा मिळाला तर उर्वरीत सर्व तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र उंचावली. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण सरासरीतही वाढ झाली असून जिल्ह्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्याही आता 5 हजार 918 झाली आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 21, खासगी प्रयोगशाळेचे 59 व रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून 59 अशा तालुक्यातील एकूण 139 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील अवघे सहा, अन्य ठिकाणचे सात व दोघांची नावे दुबार आहेत. तर तालुक्यातील 57 वाड्यावस्त्यांमधील 124 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील देवाचा मळा येथील 70 व 50 वर्षीय महिलांसह 50 वर्षीय इसम व सात वर्षीय मुलगी, सुतारगल्लीतील 40 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर देवाचा मळा येथील 70 वर्षीय महिलेसह कौठे मलकापूर येथील 49 वर्षीय इसमाचे नाव दुबार नोंदविले गेले आहे. याशिवाय अन्य तालुक्यातील काकडी येथील 46 वर्षीय इसम, गळनींब येथील 23 वर्षीय तरुण, खातगाव येथील 39 व 24 वर्षीय तरुण, सोनगाव येथील 18 वर्षीय तरुण व चौक येथील 35 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय मुलगी यांचेही अहवाल संगमनेरच्या यादीत नोंदविले गेले आहेत.
तालुक्याच्या ग्रामीणभागातील आंबी खालसा येथील 60 वर्षीय महिला, वरवंडी येथील 40, 30, 22 व 19 वर्षीय तरुणांसह 35 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 55 वर्षीय इसमांसह 50, 45 व 24 वर्षीय महिला,32 व 29 वर्षीय तरुण व बारा वर्षीय मुलगा, मनोली येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 व 32 वर्षीय महिला व 36 वर्षीय तरुण, शेंडेवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हिवरगाव पठार येथील 77 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 30 वर्षीय महिला, साकूर येथील 52 व 35 वर्षीय महिलांसह 51 वर्षीय इसम, 40, 34 व 19 वर्षीय तरुण व 15 वर्षीय मुलगा, बिरेवाडीतील 58, 35 व 27 वर्षीय दोन महिलांसह 17 व 10 वर्षीय मुली व सहा वर्षीय मुलगा, पिंपळगाव देपा येथील 21 वर्षीय तरुणी,
शेडगाव येथील 85 व 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिकांसह 65, 60 व 37 वर्षीय महिला व 35 वर्षीय तरुण, पिंपरी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 व 25 वर्षीय महिला व 29 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 65 व 25 वर्षीय महिला, बोटा येथील 13 वर्षीय मुलगा, आश्वी बु. येथील 28 व 22 वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथील 40 वर्षीय महिला, पानोडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम, रणखांब येथील 55 व 43 वर्षीय महिलांसह 23 वर्षीय तरुण, खळी येथील 40 व 25 वर्षीय तरुण, ओझर बु. येथील 40 वर्षीय महिला, 32 वर्षीय तरुण व 17 वर्षीय मुलगी, मांडवे बु. येथील 32 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 32 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुण, दाढ बु. येथील 45 वर्षीय इसम,
ओझर खुर्द येथील 32, 27 व 21 वर्षीय तरुण, हंगेवाडीतील 36 वर्षीय महिला, खांबे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, झोळे येथील 27 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 28 वर्षीय महिला, कुरकुटवाडीतील 24 वर्षीय तरुण, दुसंगवाडीतील 22 वर्षीय तरुणी, चिखली येथील 36 वर्षीय तरुण, वैदुवाडीतील 34 वर्षीय तरुण, निमज येथील 65 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील 29 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण, पारेगाव येथील 69 वर्षीय महिलेसह 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 30 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 40 व 31 वर्षीय तरुणांसह 18 वर्षीय तरुणी, 16, 14 व 11 वर्षीय मुले, पिंपळगाव कोंझिरा येथील 28 वर्षीय तरुण, कणसेवाडीतील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,
पोखरी बाळेश्वर येथील 36 वर्षीय तरुण, कौठे मलकापूर येथील 49 वर्षीय इसम, रहिमपूर येथील 53 व 44 वर्षीय इसमांसह 27 वर्षीय तरुण, कोल्हेवाडीतील चार वर्षीय बालिका, मालुंजे येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 36 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 31 वर्षीय तरुण व 24 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 59 वर्षीय इसम, सायखिंडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोठे खुर्द येथील 40 वर्षीय तरुण, कोकणेवाडीतील 52 वर्षीय इसमासह 43 वर्षीय महिला, पिंपळे येथील 49 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 36 वर्षीय तरुण, कनोली येथील 49 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुण, धांदरफळ येथील 41 वर्षीय महिलेसह 38 व 35 वर्षीय तरुण, 13 वर्षीय मुलगी, जोर्वे येथील 43 वर्षीय इसम, निळवंडे येथील 28 वर्षीय महिला, देवगाव येथील आठ वर्षीय मुलगी, सुकेवाडीतील 72 व 29 वर्षीय महिलांसह 36 वर्षीय तरुण व दहा वर्षीय मुलगी, वरुडी पठार येथील 70 वर्षीय महिला व वेल्हाळे येथील 45 वर्षीय इसमाचा आजच्या पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
जिल्ह्याची रुग्णसंख्या आजही वाढलीच; आजही जिल्ह्यात 25 जणांचा बळी!
मंगळवारी सहाशेच्या घरात आलेली जिल्ह्याची रुग्णसंख्या आज पुन्हा एकदा वाढली. आज शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले 208, खासगी प्रयोगशाळेचे 255 आणि रॅपीड अँटीजेनच्या चाचणीतून समोर आलेले 306 अशा जिल्ह्यातील एकूण 769 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधीक पारनेर 144, संगमनेर 139, नगर ग्रामीण 57, अकोले 54, पाथर्डी व शेवगाव प्रत्येकी 53, श्रीगोंदा 30, जामखेड व नेवासा प्रत्येकी 31, राहाता 29, अहमदनगर महापालिका क्षेत्र 28, कर्जत 26, इतर जिल्ह्यातील 21, श्रीरामपूर 18 व राहुरी तालुक्यातील 16 जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 13 हजार 926 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 1 हजार 594 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून सध्या 5 हजार 918 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 414 रुग्णांचा कोविडने बळी घेतला असून जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर आता 96.07 टक्के झाला आहे. आज जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत 769 जणांची भर पडली तर 883 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील 25 जणांचा बळी गेला आहे.