शेतीच्या वादातून एकास जबर मारहाण
शेतीच्या वादातून एकास जबर मारहाण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील चिकणी येथे शेतीच्या किरकोळ वादातून तिघांनी एकास लोखंडी फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण केली आहे. याबाबत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल होवूनही तपासी अधिकार्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

25 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 10 वाजता फिर्यादी महेश माधव वर्पे हे गवत कापत असताना बांधाच्या किरकोळ कारणावरुन भाऊपाटील कारभारी शिंदे, रवींद्र भाऊपाटील शिंदे आणि स्वाती रवींद्र शिंदे या तिघांनी महेश वर्पे यांना लोखंडी फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण केली. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन महिला स्वाती शिंदे हिने चप्पलने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. यावरुन संगमनेर तालुका पोलिसांनी वरील तिघांविरोधात भांदवि कलम 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. परंतु एवढे दिवस लोटूनही तपासी अधिकारी ईस्माईल शेख यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यामुळे पोलीस आरोपींच्या दबावाखाली आहे का? असा सवालही फिर्यादीने उपस्थित केला आहे. याबाबत पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी. अन्यथा परिवारासह उपोषणास बसू, असा इशारा फिर्यादी महेश वर्पे यांनी दिला आहे.

