जिल्ह्यात आजही विक्रमी रुग्णांची पडली भर! संगमनेरातील रुग्णसंख्येने आजही ओलांडली पुन्हा शंभरी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड संक्रमणाने घेतलेली गती आज किंचित प्रमाणात वाढली असून आजही जिल्ह्यातील 1 हजार 842 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रात कोविडचा उद्रेक कायम असून आज श्रीरामपूर, राहाता, नगर ग्रामीण व संगमनेर तालुक्यातूनही शंभरपेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 1 लाख 2 हजार 496 झाली असून संगमनेर तालुकाही आता 9 हजार 187 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आज अहमदनगर पाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यातून सर्वाधीक 150 तर राहाता तालुक्यातून 141 रुग्ण समोर आले आहेत.

जिल्ह्यात सुरु झालेल्या कोविडच्या दुसर्या संक्रमणाने हाहाकार माजवायला सुरुवात केली असून जिल्हा सध्या कठोर निर्बंधांचा सामना करीत आहे. असे असतांनाही रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने कडक लॉकडाऊनची टांगती तलवार कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकूटीला आला आहे. शासन अद्यापही पूर्णतः लॉकडाऊनच्या विरोधात असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्क आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास टाळेबंदीचे संकट टाळले जावू शकते. मात्र प्रत्यक्षात या गोष्टींकडे अनेकजण दुर्लक्षच करीत असल्याने जिल्ह्यातील कोविडचा संसर्ग वाढतच चालला असून जिल्ह्याचा प्रवास पुन्हा एकदा अनिश्चिततेकडे सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

आजही जिल्ह्यातील कोविड रुग्णवाढीचा उच्चांक कायम असून जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यांच्या दैनिक सरासरीत गेल्या पाच दिवसांतील वाढीव रुग्णसंख्येने मोठी भर पडल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील अहमदनगर महापालिका क्षेत्रात कोविडचा प्रादुर्भाव सर्वाधीक असून या परिसरातून दररोज सरासरी 490 रुग्ण समोर येत आहेत. तर जिल्ह्यातील सर्वात कमी संक्रमण असलेल्या तालुक्यांमध्ये जामखेडचा समावेश असून या तालुक्यातून दररोज सरासरी 40 रुग्ण समोर येत आहेत. कोविडच्या दुसर्या संक्रमणाचा वेग उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये अधिक असून अकोले वगळता उत्तरेतील बहुतेक सर्वच तालुक्यांचा सरासरी रुग्णवाढीचा वेग 75 पेक्षा अधिक आहे.

एप्रिलच्या पहिल्या चारच दिवसांत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची कोविड स्थिती चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे. गेल्या पाच दिवसांत सरासरी वेगाने आढलेले रुग्ण पुढीलप्रमाणे (कंसात आजची रुग्णसंख्या) अहमदनगर महापालिका क्षेत्रात सरासरी 490 वेगाने 2 हजार 451 रुग्ण (666), नगर ग्रामीण सरासरी 97 रुग्ण वेगाने 485 (129), राहाता सरासरी 159.4 रुग्ण 797 (141), श्रीरामपूर सरासरी 134.6 रुग्ण 673 (150), कोपरगाव सरासरी 128.4 रुग्ण 642 (109), संगमनेर सरासरी 100 रुग्ण 500 (113), पाथर्डी सरासरी 90.4 रुग्ण 452 (59), राहुरी सरासरी 81.4 रुग्ण 407 (64), नेवासा सरासरी 67 रुग्ण 334 (54), शेवगाव सरासरी 56 रुग्ण 280 (94), कर्जत सरासरी 55.6 रुग्ण 278 (55.6), अकोले सरासरी 52.2 रुग्ण 261 (69), भिंगार लष्करी परिसर सरासरी 67.4 रुग्ण 237 (25), पारनेर सरासरी 47.2 रुग्ण 236 (61), श्रीगोंदा सरासरी 41.8 रुग्ण 209 (41.8) आणि जामखेड सरासरी 40.2 रुग्ण 201 (23) या प्रमाणे गेल्या पाचच दिवसांत जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत 8 हजार 443 रुग्णांची भर पडली आहे.

आज संगमनेर तालुक्यातील 113 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 66 अहवाल शासकीय प्रयोगशाळेद्वारे, 46 अहवाल खासगी प्रयोगशाळेद्वारा तर एक अहवाल रॅपीड अँटीजेनद्वारा प्राप्त झाला आहे. आज आढळलेल्या शहरातील 34 जणांमध्ये गोविंदनगर मधील 38 वर्षीय महिला, संजय गांधी नगरमधील 44 वर्षीय तरुण, शिवाजी नगरमधील 42 व 17 वर्षीय तरुणांसह 49, 48, 37 व 35 वर्षीय महिला, पावबाकी रस्त्यावरील 32 वर्षीय तरुण, सावता माळी नगरमधील 33 वर्षीय महिला, पंचायत समिती जवळील परिसरातील 24 वर्षीय तरुण, नेहरु चौकातील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अकोले बायपास वरील तीन वर्षीय बालक, जनतानगर मधील 55 वर्षीय महिलेसह 54 वर्षीय इसम, चावडी चौकातील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय महिला, जोर्वे रस्त्यावरील 19 वर्षीय तरुणी, इंदिरानगरमधील 65 व 32 वर्षीय महिला,

गणेशनगर मधील 52 वर्षीय इसम, भरीतकर मळ्यातील 31 वर्षीय तरुण व 31 वर्षीय महिलेसह तीन वर्षीय बालिका, माताडे मळ्यातील 34 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 44 व 42 वर्षीय तरुणांसह 14 वर्षीय मुलगा आणि 40 व 22 वर्षीय महिला आणि 16 वर्षीय तरुणी, बसस्थानक परिसरातील 44 वर्षीय महिला, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील 31 वर्षीय तरुण, इंडिया बँकेजवळील 40 वर्षीय तरुण आणि संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 48 वर्षीय इसमासह 28 वर्षीय महिला अशा शहरातील एकूण 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 2 हजार 803 झाली आहे.

याशिवाय ग्रामीण क्षेत्रातील पिंपरी येथील 18 वर्षीय तरुण, साकूर येथील 70 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 49 वर्षीय इसम, 28 वर्षीय तरुण व 29 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 31 वर्षीय तरुण, काकडवाडी येथील 36 व 21 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 30 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 27 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 40 व 32 वर्षीय तरुण, 49 व 23 वर्षीय महिला, दाढ बु. मधील 18 वर्षीय तरुण, झरेकाठी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 19 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 25 वर्षीय महिला, चिखली येथील 60 वर्षीय महिला, सादतपूर येथील 38 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 40 व 41 वर्षीय तरुण, रहाणे मह्यातील 63 वर्षीय महिला, गोल्डन सिटीतील 42 व 29 वर्षीय महिला,

पेमगिरीतील 65 वर्षीय ज्येश्ठ नागरिक, नान्नज दुमाला येथील 36 वर्षीय महिला, लोहारे येथील 38 वर्षीय महिला, खांडगाव येथील 54 वर्षीय महिलेसह 30, 26 व 24 वर्षीय तरुण, खळी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 व 26 वर्षांचे दोन तरुण आणि 60 वर्षीय महिला, निमोण येथील 30 वर्षीय तरुण आणि 29 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 37 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 54 वर्षीय इसम, चणेगाव येथील 53 व 45 वर्षीय इसम, पारेगाव बु. येथील 20 वर्षीय तरुणी, वेल्हाळे येथील 37 व 29 वर्षीय तरुणांसह 55, 30 व 21 वर्षीय महिला व सहा वर्षीय बालिका, राजापूर येथील 42 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, ढोलेवाडीतील 46 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुण,

कनोली येथील 34 वर्षीय महिला व 29 वर्षीय तरुण, आश्वी बु. येथील 50 वर्षीय इसम, आश्वी खुर्दमधील 50 वर्षीय इसमासह 36 वर्षीय तरुण, 21, 19 व 14 वर्षीय तरुणींसह 13 वर्षीय मुलगा, खांबा येथील 19 वर्षीय तरुण व घुलेवाडीतील 53, 45, 29 व 25 वर्षीय महिलांसह 51 व 50 वर्षीय इसम आणि 37, 32, 21 व 17 वर्षीय तरुणांसह तेरा वर्षीय मुलगा.तर बाह्य तालुक्यातील श्रीरामपूर येथील 30 वर्षीय तरुण, धानोरे (ता.राहाता) येथील 60 वर्षीय महिला व 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशा एकूण 113 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

