शारदा पतसंस्थेला तीन कोटी एकाहत्तर लाखांचा नफा! टाळेबंदीनंतरच्या काळातही ग्राहकाभिमुख सेवेद्वारे संस्थेने घेतली भरारी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा नागरी पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात विविध ग्राहकाभिमुख सेवांच्या जोरावर, टाळेबंदीच्या काळातही भरारी घेत तब्बल 3 कोटी 71 लाख रुपये नफा मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून उच्च दर्जाची सेवा आणि पारदर्शक व्यवहार यामुळे ठेवीदारांचा विश्वास संपादन करीत संस्थेने आपल्या ठेवींचा आकडा 141 कोटींच्या पुढे नेेल्याची माहिती संस्थेचे चेअरमन राजेश रा. मालपाणी यांनी दिली.
संस्थेच्या 31 मार्च, 2021 अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना श्री.मालपाणी म्हणाले की, टाळेबंदीनंतरच्या आर्थिक मंदीतही ठेवीदार व ग्राहकांनी संस्थेवर विश्वास ठेवल्याने संस्थेच्या ठेवी ठेवींमध्ये गेल्या आर्थिक वर्षात मोठी भर पडली आहे. पारदर्शक व्यवहार, ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणार्या विविध योजना आणि पारदर्शक व्यवहार यामुळे सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांशी संस्थेचे जिव्हाळ्याचे संबंध स्थापित झाले असून स्थापनेपासूनच संस्थेने हा मूलमंत्र जोपासल्याने संस्थेने तालुक्यातील आघाडीच्या पतसंस्थांमध्ये स्थान मिळविल्याचे त्यांनी सांगीतले.
गेल्या आर्थिक वर्षात 226 कोटी 73 लाख रुपयांचा व्यवसाय करतांना शारदा पतसंस्थेने 85 कोटी 26 लाख रुपयांचे कर्ज वाटप करुन व्यापारी व ग्राहकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. गरजू व व्यवहारी कर्जदार या निकषाची प्रत्येक संचालकाने काटेकोर काळजी घेतल्याने गेल्या आर्थिक वर्षात संस्थेची थकबाकी नगण्य ठेवण्यातही संचालक मंडळाने यश मिळवल्याचे व्हा.चेअरमन सुमित आट्टल यांनी सांगितले. स्थापनेपासूनच यशाचा एक-एक टप्पा पार करताना 31 मार्च, 2021 अखेर संस्थेने तब्बल 3 कोटी 71 लाख रुपयांचा एनपीए तरतूद पूर्व नफा मिळवित संगमनेरच्या पतसंस्था चळवळीत नवी भरारी घेतली आहे.
संस्थेचे मार्गदर्शक गिरीश मालपाणी यांच्या नेतृत्त्वाखाली यापुढेही संस्थेच्या प्रगतीची घोडदौड अशीच कायम राहील असा विश्वास चेअरमन राजेश रा. मालपाणी, व्हा. चेअरमन सुमित आट्टल, संचालक मंडळाचे सदस्य डॉ.योगेश भुतडा, कैलास आसावा, सीए संकेत कलंत्री, राजेश लाहोटी, रोहित मणियार, कैलास राठी, अमर झंवर, विशाल पडतानी, उमेश झंवर, सागर वाकचौरे, सोनाली नावंदर, रतिका बाहेती, जगदीश टोकसे, सोमनाथ कानकाटे, लक्ष्मीनारायण पलोड, राजकुमार पोफळे, व्यवस्थापक माधव भोर, शाखा व्यवस्थापक विलास सांगळे, वसुली अधिकारी संतोष गोयल यांचेसह सर्व अधिकारी व कर्मचारी वृदांनी व्यक्त केला आहे.