ठाकरे सरकारने राज्यातील महिला अत्याचारांकडेही लक्ष द्यावे ः गोडसे
ठाकरे सरकारने राज्यातील महिला अत्याचारांकडेही लक्ष द्यावे ः गोडसे
अकोलेत भाजपचे आक्रोश आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन
नायक वृत्तसेवा, अकोले
भाजप सरकार असलेल्या राज्यात महिलांवरील अत्याचार महाराष्ट्र राज्य सरकारला दिसतो. मात्र स्वतः दिव्याखाली अंधार हे महाराष्ट्र सरकारला दिसत नाही. त्यामुळे ठाकरे सरकारने राज्यातील महिलांवरील अत्याचारांकडे लक्ष द्यावे, अशी टीका भाजप महिला आघाडीच्या रेश्मा गोडसे यांनी केली.
अकोले तहसील कार्यालय येथे सोमवारी (ता.12) भाजपच्यावतीने माजी आमदार वैभव पिचड व तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा संगीता शेटे, सभापती उर्मिला राऊत, पंचायत समिती सदस्या सीताबाई गोंदके यांच्या हस्ते तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. उपसभापती दत्तात्रय देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, यशवंत आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, रमेश राक्षे, सोमनाथ मेंगाळ, राजेंद्र डावरे, अॅड. डी. डी. शेटे, राहुल देशमुख, राहुल बेनके, राजेंद्र देशमुख, कविराज भांगरे, नाजीम शेख, विठ्ठल कानवडे, शैलेश फटांगरे, गणेश पोखरकर, संजय लोखंडे, अमोल येवले, मच्छिंद्र चौधरी, दत्तात्रय भोईर, कोतवाल आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसीलदार कांबळे यांना देण्यात आलेल्या निवेदन म्हंटले आहे की, तालुक्यातील अनन्या शिंदे या लहान मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला, मात्र तिला कोरोना झाल्याचे सांगून संगमनेरला काढून दिले. मात्र, रस्त्यामध्ये मृत्यू झाला. तिच्यावर वेळेवर उपचार न करता हलगर्जीपणा दाखविण्यार्या वैद्यकीय अधिकार्यांची पाठराखण केली जात आहे. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांना न्याय द्यावा. महादेववाडी, खानापूर, टाकळी, ब्राह्मणवाडा, धामनवन याठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचाराला न्याय देऊन दोषींना शिक्षा करावी. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असून, कोविड सेंटरमध्येही महिलांवर अत्याचार झाले आहे हे सर्व आरोपी मोकाट फिरत आहे. अशा सर्व दोषींना शिक्षा द्यावी. नगर येथील पोलीस निरीक्षक वाघ यांनी महिलेवर अत्याचार केला. परंतु त्याची फिर्याद कोणीही नोंदवून घेत नाही म्हणून त्यांच्यावर देखील कारवाई करावी, अशी मागणी करुन राज्य सरकार महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत असंवेदशील असून निष्क्रिय सरकार असल्याची टीका करण्यात आली आहे.