अकोलेत महावितरणच्या अधिकार्‍यास धमकी

नायक वृत्तसेवा, अकोले
सध्या महावितरण कंपनीने वसुलीची मोहीम जोरात सुरू केलेली आहे. अनेकदा ग्राहकांना तोंड देताना वाद-विवाद होण्यातून थेट हाणामारीपर्यंत प्रकरण जात असल्याचेही समोर येत आहे. नुकतेच अकोले शहरातील महालक्ष्मी वसाहतीमध्ये एका घरगुती वीजवापर ग्राहकाकडून वसुली करताना कडाक्याचे भांडण झाल्याने अखेर हे प्रकरण पोलिसांत पोहोचले. यावरुन पोलिसांत ग्राहकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील महालक्ष्मी वसाहतीमधील घरगुती वीजवापर ग्राहक मिलिंद रुपवते यांच्याकडे थकीत राहिलेली वसुली करण्यासाठी महावितरणचे सहाय्यक अभियंता गिरीश मुळे, शहर कक्ष अधिकारी नम्रता जाधव, मनीषा तोरमल, वीज कर्मचारी नारायण मेंगाळ, भूषण सपकाळे आदी गेले होते. त्यावेळी रुपवते यांनी वुसली अधिकार्‍यांसमवेत कडाक्याचे भांडण केले. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रुपवते याच्यावर गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Visits: 85 Today: 1 Total: 1106889

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *