नेवासा फाट्यावरील जुगार अड्ड्यावर छापा

नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा फाटा येथील टपाल कार्यालय परिसरातील एका इमारतीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून आठ जुगार्‍यांना ताब्यात घेत 1 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी जुगार अड्यावर केलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षक करे यांना मिळालेल्या माहितीवरुन नेवासा पोलिसांनी नेवासा फाटा येथील टपाल कार्यालय परिसरात एक इमारतीच्या आडोशाला छापा टाकून राहुल जनार्धन लाड (वय 28), रशीद मुस्तफा शेख (वय 30), गणेश लक्ष्मण गायकवाड (वय 25), दत्तात्रय गोरख साळवे (वय 24), आकाश अनिल गायकवाड (वय 27), आदिनाथ शेटीबा धनवटे (वय 25), इलेश संजय साळवे (वय 22), संदीप सूर्यभान धनगर (वय 27, सर्व रा.नेवासा फाटा, ता.नेवासा) या आठ जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम, सात विविध कंपनीचे मोबाईल संच तसेच तीन दुचाकी असा 1 लाख 67 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल आणि तिरट नावाचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

Visits: 92 Today: 2 Total: 1100048

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *