श्रीरामपूर पोलिसांनी दोन तलवारींसह एकास पकडले

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरात दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन दहशत निर्माण करणार्‍या शाहरुख शेखला पोलिसांनी पकडले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील प्रभाग दोनमधील साईनगर येथील कच्च्या रस्त्याने एक इसम दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरत आहे अशी माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांचे पथक साईनगर येथे गेले असता समोरून एक इसम दोन हातात दोन तलवारी घेऊन येताना दिसला. पोलीस त्याच्या दिशेने गेले असता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने शाहरुख अन्वर शेख (वय 21, रा.शनि चौक, प्रभाग 2, श्रीरामपूर) असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचासमोर त्यांची अंगझडती घेतली. त्यामध्ये त्याच्या ताब्यात असलेल्या 1 हजार 100 रुपयांच्या दोन लोखंडी तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस शिपाई मोहन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख शेख याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 04/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, मुख्य हवालदार जोसेफ साळवी, पोलीस शिपाई किशोर जाधव, राहुल नरवडे, महेंद्र पवार, पंकज गोसावी, सुनील दिघे आदिंनी ही कामगिरी केली.

Visits: 161 Today: 2 Total: 1787276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *