वाकडीतील जिल्हा बँकेच्या शाखाधिकार्‍याची आत्महत्या

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकार्‍याने राहाता-चितळी रस्त्यालगत असलेल्या वाकडी शिवारात विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाकडी येथील जिल्हा सहकारी बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मनोहर गायकवाड यांचा बुधवारपासून (ता.24) भ्रमणध्वनी बंद येत होता. यामुळे नातेवाईकांनी शोध सुरू केला. दरम्यान, राहाता-चितळी रस्त्यावरुन नातेवाईक जात असताना त्यांना वाकडी शिवारातील कानिफनाथ फाट्यावर जमाव दिसला. म्हणून पाहणी केली असता त्यांना गायकवाड यांची दुचाकी दिसली. त्यानंतर माहिती समजताच इतर नातेवाईकांनी तत्काळ धाव घेत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गायकवाड यांना शिर्डीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारांपूर्वीच ते मयत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. या प्रकरणी शिर्डी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

Visits: 192 Today: 1 Total: 1960076

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *