प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी ः थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाची दुसरी लाट आली असून अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. संगमनेर तालुक्यातही वाढणारी रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक असून नागरिकांनी निष्काळजीपणा न करता गर्दी टाळत, सुरक्षित अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करून प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी म्हणजे आपला परिवार कोरोनापासून सुरक्षित राहील, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेरातील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात कोरोना रुग्णवाढीबाबत उपाययोजना व लसीकरणाबाबत शुक्रवारी (ता.26) घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ.राजकुमार जर्‍हाड, डॉ.संदीप कचेरिया, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, मुकुंद देशमुख, डॉ.वसीम शेख, डॉ.सुरेश घोलप, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.

Visits: 168 Today: 3 Total: 1112288

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *