संगमनेर शहरासाठी अत्यंत दिलासादायक बातमी..! मात्र ग्रामीण भागातील संक्रमणात आजही सातत्य कायम..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला संगमनेरकरांना कोविडच्या संसर्गातून मिळालेला दिलासा आजही अव्याहत असून शहर आणि ग्रामीण क्षेत्रातील रोजच्या रुग्णसंख्येला ओहोटी लागल्याचे चित्र आहे. मात्र दररोज हाती येणार्या अहवालातून संक्रमित झालेल्यांच्या संपर्कासह नवीन भागातूनही रुग्ण समोर येत असल्याने धोका अजूनही कायम असल्याचेच संकेत मिळत आहेत. आजच्या अहवालातून अशा पद्धतीने बाधित झालेले 36 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील अवघ्या तिघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याचे पाऊलं चार हजार रुग्णसंख्येच्या दिशेने निघाले असून तालुका 3 हजार 945 वर जावून पोहोचला आहे.
नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला संगमनेरकरांना दिलासा मिळाला होता. शहरातील अवघ्या सात जणांसह तालुक्यातून एकूण 29 जणांचे अहवाल गेल्या काही दिवसांतील वाढत्या रुग्णसंख्येत दिलासादायक ठरल्याने तालुकावासियांना हायसे झाले आहे. मात्र अशीच परिस्थिती कायम ठेवायची असेल तर तोंडावर मास्क, खिशात सॅनिटायझर आणि सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर या तिनही गोष्टींना सतत सोबत ठेवून त्याचे पालन करावे लागणार आहे. गेल्या दोन दिवसांतील घटलेल्या आकडेवारीने संगमनेरकरांच्या चेहर्यावर काहीसा आनंद निश्चितच निर्माण केला आहे, मात्र आपली एक चूक या आनंदावर विरजन टाकणारी ठरु शकते याचे प्रत्येक नागरिकाने स्मरण ठेवण्याची गरज आहे.
आज खासगी प्रयोगशाळेकडून 15 जणांचे, शासकीय प्रयोगशाळेकडून दोघांचे तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 21 जणांचे अहवाल प्राप्त झाले. आजच्या आकडेवारीतून संगमनेर शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या एकूण बाधितांमध्ये संगमनेर शहरातील अवघ्या तिघांचा समावेश आहे. तर आज ग्रामीण भागातून 33 रुग्ण समोर आले आहेत. शहरात बाधित आढळून आलेल्या व्यक्तींमध्ये ताजणेमळा परिसरातील 46 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण व शिवाजीनगर परिसरातील 42 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
यासोबतच आज तालुक्यातील 33 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. त्यात आनंदवाडीतून 25 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथून 57 वर्षीय इसमासह 48 व 31 वर्षीय महिला, सारोळे फाटा परिसरातील 60 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 35 वर्षीय तरुणासह 54 वर्षीय महिला, चिकणी येथून 46 वर्षीय इसम, साकुर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पेमगिरी येथील 34 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तळेगाव दिघे येथील 45 वर्षीय दोन महिलांसह 21 वर्षीय तरुण, माळेगाव हवेली येथील 82 व 53 वर्षीय इसमांसह 45 वर्षीय महिला,
कोकणगाव येथील 53 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण व 47 वर्षीय महिला, जोर्वे येथील 44 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण, राजापूर येथील 29 वर्षीय महिलेसह 13 व चार वर्षीय बालिका, सारोळे पठार येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 वर्षीय तरुण, गोडसेवाडी येथील 19 वर्षीय तरुणी, संगमनेर खुर्द येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 68, 65 व 38 वर्षीय महिला आणि शेडगाव येथील 24 वर्षीय महिलेचा अहवाल आज पॉझिटिव प्राप्त झाला आहे. आजच्या एकूण रुग्ण संख्येत 36 बाधितांची नव्याने भर पडल्याने संगमनेर तालुका चार हजार रुग्णसंख्येच्या दिशेने अग्रेसर होत 3 हजार 945 वर पोहोचला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ७१२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९४.१० टक्के इतके झाले आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३८५ ने वाढ झाली. त्यामुळे आता जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या २ हजार ३१२ झाली आहे.
शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ९३, खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ११० तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज १८२ रुग्ण बाधीत आढळले.
शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून संक्रमित झालेल्यांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ४१, अकोले १७, जामखेड ०४, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०१, नेवासा १२, पारनेर ०४, राहुरी ०३, संगमनेर ०२, शेवगाव ०३, श्रीरामपूर येथील दोघांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३८, अकोले ०५, जामखेड ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १४, नेवासा ०३, पारनेर ०६, पाथर्डी ०५, राहाता १३, राहुरी ०७, संगमनेर १३, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०१ व श्रीरामपूर येथील एकाला संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.
रॅपिड अँटीजेन चाचणीत आज १८२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १२, अकोले २२, जामखेड ११, कर्जत १५, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०४, नेवासा १०, पारनेर ०५, पाथर्डी १६, राहाता १३, राहुरी ०२, संगमनेर २१, शेवगाव २३, श्रीगोंदा ०९ व श्रीरामपूर येथील १३ जणांचा समावेश आहे.
आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांंमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १०६, अकोले २४, जामखेड २०, कर्जत २२, कोपरगाव १२, नगर ग्रामीण ३१, नेवासा २२, पारनेर १४, पाथर्डी ६८, राहाता ३१, राहुरी १८, संगमनेर ५०, शेवगाव ११, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर २४, लष्करी परिसर ०३ व लष्करी रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे.
- जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या :४९ हजार ७१२..
- जिल्ह्यात सध्या उपचार सुरसुरुलेले रुग्ण : २ हजार ३१२..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ८०३..
- जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या : ५२ हजार ८२७..
- जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१० टक्के..
- आज जिल्ह्यातील ४७५ रुग्णांना डिस्चार्ज तर ३८५ बाधितांची नव्याने पडली भर..