डोळासणे महामार्ग पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
नायक वृत्तसेवा, घारगाव
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील डोळासणे येथे महामार्ग हद्दीतही ठिकठिकाणी पोलीस तैनात केले आहेत. त्यांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व अल्पोपहाराचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे. सदर सामाजिक उपक्रम इंजिनिअरिंग कृती समितीच्यावतीने राबविण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना विषाणूने पुन्हा एकदा थैमान घातल्याने दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस दिवस-रात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहे. याची दखल घेत इंजिनिअरिंग कृती समितीचे पदाधिकारी खान्देश विभागाचे संपर्कप्रमुख अनुराग जाधव, संगमनेर तालुक्याचे सचिव विशाल वाळुंज, धनंजय गांजवे, ऋषीकेश फटांगरे, अभिषेक घोडेकर यांनी डोळासणे महामार्ग पोलीस केंद्रातील अधिकारी व कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर आणि अल्पोपहाराचे वाटप केले. या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.