शिक्षण विभागाच्या कार्यालयाला मेहेंदुरी ग्रामस्थांनी ठोकले टाळे

नायक वृत्तसेवा, अकोले
शिक्षकाच्या मागणीसाठी अकोले पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाला मेहेंदुरी येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पालकांनी सोमवारी (ता.4) टाळे ठोकले. त्यानंतर शिक्षण विभागाला जाग येऊन तत्काळ एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली.

तालुक्यातील मेहेंदुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने गावातील नागरिकांनी अकोले पंचायत समिती येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाला सोमवारी टाळे ठोकले. याची तत्काळ दखल घेतली नाही तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश कानवडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. याची गटशिक्षणाधिकार्‍यांनी दखल घेतली. आणि आमदार डॉ. किरण लहामटे आणि जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी यशस्वी मध्यस्थी करून मेहेंदुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे सांगितले. गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांच्या लेखी आश्वासनानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. अविनाश कानवडे, विद्यार्थी व पालक यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सागर आरोटे, सिद्धेश मोहोटे, विकास चासकर, नितीन बंगाळ, गणेश वाबळे, सुरेश गायकवाड, रोहिदास पवार, सुनील आरोटे, सतीश बंगाळ, प्रशांत बंगाळ, सागर रामदास आरोटे आदी पालक उपस्थित होते.

Visits: 90 Today: 2 Total: 1113850

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *