नेवासा तालुक्यात घरगुती वीज जोडणी तोडण्याचा सपाटा

नायक वृत्तसेवा, नेवासा
कोरोना महामारीत कामधंदे बंद असल्याने सर्वसामान्य कुटुंबांची उपासमार होत आहे. तर कोणतीही पूर्वसूचना न देता नेवासा तालुक्यात घरगुती वीज जोडणी तोडण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला असून याच्या निषेधार्थ 1 एप्रिलला उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष रमेश राजगिरे यांनी दिला आहे.

याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात राजगिरे यांनी म्हटले आहे की, शासनाने प्रशासन व्यवस्थित चालवावे, जनसामान्यांना कर भरण्याची सवय लागावी यासाठी वसुली सुरू केली आहे हे जरी सत्य असले तरी ही सर्वसामान्य ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता थकबाकीदारांच्या घरासमोर येऊन वीज जोडणी तोडण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक हवालदिल झाले आहेत. तत्पूर्वी ग्राहकांना नोटिसीद्वारे कळविणे गरजेचे होते. मात्र तसे न करता सक्तीची पठाणी वसुली करणे ही बाब निषेधार्थ आहे. याच्या निषेधार्थ 1 एप्रिलला ग्रामस्थांना घेऊन उपोषणास बसणार असल्याचा इशारा रमेश राजगिरे यांनी दिला आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 27349

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *