कृषी ऊर्जा अभियानास संगमनेरात उत्तम प्रतिसाद साडेचार लाखांचा भरणा केल्याबद्दल महावितरणकडून कुटेंचा सत्कार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यात महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या ‘कृषी ऊर्जा अभियान योजना 2020’ व ‘कृषी ऊर्जा पर्व’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य, दूधगंगा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब कुटे यांनी स्वत: पुढाकार घेवून स्वत:ची पाच वीजबिलांची 4 लाख 38 हजार 810 रुपयांचा भरणा केला आहे. याबद्दल कल्याण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेश्मे यांनी मंगळवारी (ता.23) कुटे यांचा थकबाकी मुक्त झाल्याचे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.

संगमनेर विभागातंर्गत आत्तापर्यंत 1 हजार 678 कृषी ग्राहकांनी कृषी सन्मान योजनेचा लाभ घेवून संपूर्ण थकबाकीमुक्त झाले आहेत. तर 23 हजार 858 ग्राहकांनी योजनेत सहभाग नोंदवून 17.32 कोटी रक्कमेचा भरणा केला आहे. तसेच भविष्यातही दर्जेदार सेवा मिळणेसाठी महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे अहमदनगर मंडलाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी केले आहे. यावेळी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Visits: 115 Today: 1 Total: 1981531

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *