पठारभागात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील भोजदरी गावांतर्गत असलेल्या बाळंद्री येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (ता.22) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बाळंद्री येथील सतरावर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून आरोपी विक्रम मधुकर ताजणे (रा.कुमशेत, ता.जुन्नर, जि.पुणे) याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विक्रम ताजणे याच्याविरोधात गुरनं.67/2021 भादंवि कलम 354 अ, 452 (1) (डब्ल्यू) 3 पोक्सो 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक राहुल मदने हे करत आहे.

Visits: 167 Today: 2 Total: 2123331

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *