अवघ्या बारा तासांत कोविडने घेतले संगमनेरातील दोघांचे बळी! संगमनेरातील कोविड बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची श्रृंखलाही सुरुच
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही असंवेदनशील नागरिकांनी आवतणं देवून जिल्ह्यात बोलावलेल्या कोविडचा उद्रेक आजही कायम आहे. दररोज एकमेकांशी स्पर्धा करणारी रुग्णसंख्या आणि आता त्यातच मृत्यूदरात झालेली वाढ दुसर्या लाटेतील संक्रमणाची दाहकताच अधोरेखीत करीत आहे. गेल्या अवघ्या बारा तासांतच शहरातील दोघांचे कोविडने बळी घेतले असून रुग्णसंख्येचे डोंगर समोर येण्याची श्रृंखलाही कायम आहे. या साखळीत आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 69 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या आता 7 हजार 657 झाली आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील 392 रुग्ण सक्रीय संक्रमित असून आत्तापर्यंत 62 जणांचे बळी गेले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात पुन्हा परतलेल्या कोविडने रुग्णसंख्येचा आलेख उंचावत नेतानाच यावेळीची दाहकता अधिक असल्याचेही दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोविडचा वेगाने फैलाव होत असून त्यात संगमनेर तालुका पहिल्या तीनमध्ये आहे. रोज रुग्णसंख्येचे विक्रमी आकडे समोर येत असल्याने तालुका पुन्हा एकदा कोविडमय झाला असून शहरातील सर्व खासगी रुग्णालये तुडूंब झाली आहेत. शुक्रवारी गोविंदनगर भागात राहणार्या 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह शहरातील कॅप्टन लक्ष्मी चौक परिसरातील 58 वर्षीय महिलेचाही कोविडने बळी घेतला आहे. या दोन्ही रुग्णांवर संगमनेरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. त्या दरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील अधिकृत मृतांचा आकडा दोनने वाढून आता 62 झाला आहे.
तालुक्यातील रुग्णवाढीची गती आजही कायम असून आज तालुक्यातील 69 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यात संगमनेर शहरातील 26 तर ग्रामीण क्षेत्रातील 69 जणांचा समावेश आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील इंदिरानगर मधील 86 व 40 वर्षीय महिलांसह 18 वर्षीय तरुण, शिवाजी नगरमधील 48 वर्षीय महिला, माळीवाड्यातील 54 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 53 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण, 64 व 40 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगी व 3 वर्षीय बालक, नवीन नगर रस्त्यावरील 33 वर्षीय तरुण, देवी गल्लीतील 69 व 53 वर्षीय इसम, गणेशनगर मधील 59 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, 29 वर्षीय महिला आणि 14 वर्षीय मुलगा चैतन्यनगर मधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, विद्यानगर मधील 42 वर्षीय तरुण, रहेमतनगर मधील 38 वर्षीय तरुण, अशोक चौकातील 53 वर्षीय महिला, जनता नगरमधील 46 वर्षीय इसम, नाशिक रोडवरील 43 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता असलेल्या 20 वर्षीय तरुणीला संक्रमण झाले आहे.
ग्रामीण भागातील झोळे येथील 70 वर्षीय महिला, सायखिंडी येथील 76 वर्षीय वयोवृद्ध, निमगाव जाळी येथील 70 वर्षीय महिला, 56 वर्षीय इसम व 21 वर्षीय तरुणी, घारगाव येथील 45 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 52 वर्षीय इसम, सुकेवाडीतील 57 वर्षीय इसम, झरेकाठी येथील 45 वर्षीय इसम, राजापूर येथील 28 वर्षीय महिला, जाखोरीतील 22 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्दमधील 77 वर्षीय ज्येष्ठासह 58 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 63, 60 व 32 वर्षीय महिलांसह 10 व 6 वर्षीय मुली, 62 वर्षीय ज्येष्ठासह 40, 37, 36, 34 व 33 वर्षीय तरुण,
धांदरफळ बु. येथील 32 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 58 वर्षीय दोघांसह 57 वर्षीय इसम व 34 वर्षीय तरुण आणि 49 वर्षीय महिलेसह 6 वर्षीय बालिका. चंदनापुरी येथील 40 वर्षीय तरुण, निमज येथील 36 वर्षीय दोघे तरुण, खंदरमाळ येथील 36 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 36 वर्षीय तरुण, नांदूरी दुमाला येथील 46 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 47 वर्षीय इसम, पिंपळगाव देपा येथील 12 वर्षीय मुलगा, पिंपरी येथील 29 वर्षीय तरुण आणि जवळे कडलग येथील 68 वर्षीय महिलेसह 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशा एकूण 69 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या आता 7 हजार 657 वर पोहोचली आहे.