मनोहरपूर शिवारात रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला अपघात की घातपात; अकोले पोलीस करताहेत तपास


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातून जाणार्‍या कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत मनोहरपूर शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (ता.१७) आढळून आला आहे. अंदाजे दोन दिवसांपासून हा मृतदेह पडलेला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, हा अपघात आहे की घातपात आहे याचा पोलीस तपास करत असून, ऐन दिवाळीत हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, की मनोहरपूर शिवारात कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत धांदरफळ येथील यशवंत गोर्डे यांचा मृतदेह पडलेला होता. याची माहिती अकोले पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भूषण हंडोरे, खैरनार गवारी, पोना. महेश आहेर, पोकॉ. हासे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. खड्ड्यांत असलेला हा मृतदेह तरुणांच्या मदतीने वर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलवला. यावेळी घटनास्थळी ये-जा करणार्‍यांसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, दुचाकीवरील ताबा सुटून हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, हा अपघात आहे की घातपात आहे याचा उपनिरीक्षक भूषण हंडोरे हे तपास करत आहे. ऐन दिवाळीच्या धामधुमीत हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 58 Today: 1 Total: 438091

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *