सावरगाव घुलेच्या सरपंचपदी खरात बिनविरोध

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजू खरात यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सावरगाव घुले ग्रामपंचायतवर शेतकरी विकास मंडळाचे निर्विवाद वर्चस्व असल्याने खरात यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी उपसरपंच नामदेव घुले, सदस्य राजेंद्र घुले, घमाजी भुतांबरे, लिलाबाई घुले, सीमा कडू, अलका घुले आदिंसह निवडणूक अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले होते. आरक्षण निघालेल्या जागेवरील सदस्य निवडून आलेला नसल्याने फेरआरक्षण काढण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जाती महिला ऐवजी अनुसूचित जाती एवढेच आरक्षण ठेवण्यात आले. त्याजागी खरात यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. या निवडीनंतर शेतकरी विकास मंडळाचे रेवजी घुले, सोसायटीचे अध्यक्ष लहानू घुले, शेतकी संघाचे संचालक अर्जुन घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष जालिंदर घुले, जिजाबा घुले, माजी सरपंच बाबाजी घुले, देवस्थान ट्रस्टचे सचिव गोरक्षनाथ मदने, भास्कर कोठवळ, पाराजी कोठवळ, सतीश खरात, भाऊसाहेब खरात, त्रिंबक घुले, रघुनाथ घुले, विक्रम घुले आदिंनी शुभेच्छा दिल्या. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, डॉ.किरण लहामटे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
