जिल्ह्याबरोबरच राहाता व संगमनेर तालुक्यात आढळले विक्रमी रुग्ण! दररोजच्या रुग्णवाढीने जिल्हा पोहोचला कठोर निर्बंधांच्या उंबरठ्यावर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून आज (ता.17) जिल्ह्यात मार्चमधील विक्रमी रुग्ण आढळून आले आहेत. अहमदनगर, संगमनेर, राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर या पाच तालुक्यांमध्येच मार्च महिन्यातील तब्बल 72.5 टक्के रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा कठोर निर्बंधांच्या उंबरठ्यावर उभा राहीला असून अशीच स्थिती राहील्यास औरंगाबादप्रमाणे जिल्ह्यातही काही आस्थापनांना मर्यादा येण्याची शक्यता दाटली आहे. आज जिल्ह्यात तब्बल 611 रुग्ण समोर आले असून त्यात अहमदनगर तालुक्यात सर्वाधीक 226, राहाता तालुक्यात 83, संगमनेर तालुक्यात 75 तर कोपरगाव तालुक्यात 73 रुग्ण आढळले आहेत. गेल्या सतरा दिवसांत जिल्ह्याची सरासरी दररोज एक टप्पा वर जात आज थेट 358 रुग्ण दररोज या गतीवर जावून पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यातही आज विक्रमी संख्येने रुग्ण आढळल्याने तालुका आता 7 हजार 542 वर पोहोचला आहे. तालुक्यात सध्या 423 रुग्ण सक्रीय आहेत.
फेब्रुवारीत कोविडच्या दाहकतेकडे दुर्लक्ष करुन काही असंवेदनशील नागरिकांनी आपल्या पाल्यांचे विवाह सोहळे मोठ्या थाटात आणि शेकडों निमंत्रितांच्या गर्दीत उरकल्याने त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जिल्ह्याला भोगण्याची वेळ आली आहे. राज्यातील काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये अशाच कारणांनी परतलेल्या कोविडने तेथील स्थिती अशीच चिंताजनक अवस्थेत पोहोचवली आहे. रोजची होणारी रुग्णवाढ आणि शासकीय पातळीवरुन बंद झालेली तालुकास्तरावरील ‘सरकारी कोविड रुग्णालये’ यामुळे सामान्य नागरिकांना नाहक आर्थिक झळही सोसावी लागत आहे. काही धनदांडग्यांच्या आणि पुढार्यांच्या आततायीपणाचा फटका सामान्यांना बसत असून या संधीचे सोने करुन घेण्यासाठी ठिकठिकाणची खासगी रुग्णालये पुढे सरसावली असून गरीब रुग्णांची अक्षरशः लुट सुरु आहे.
आज (ता.17) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून शासकीय प्रयोगशाळेकडून 338, खासगी प्रयोगशाळेकडून 252 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 21 अशा एकूण 611 जणांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सर्वाधीक अहमदनगर महापालिका क्षेत्रात 196, नगर तालुक्यात 30, राहाता तालुक्यात 83, संगमनेर तालुक्यात 75, कोपरगाव तालुक्यात 73, अकोले तालुक्यात 25, पाथर्डी तालुक्यात 24, श्रीगोंदा तालुक्यात 21, पारनेर तालुक्यात 20, नगरच्या लष्करी क्षेत्रात 16, कर्जत तालुक्यात 15, श्रीरामपूर तालुक्यात 13, राहुरी तालुक्यात 7, नेवासा तालुक्यात 4, शेवगाव तालुक्यात 2, जामखेड तालुक्यात एक तर अन्य जिल्ह्यातील 6 अशा एकूण 611 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मार्च महिन्यातील आजची रुग्णसंख्या उच्चांकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 82 हजार 74 झाली आहे.
आज सायंकाळच्या अहवालातून संगमनेर तालुक्यातही चालू महिन्यातील उच्चांकी रुग्ण समोर आले आहेत. आज शासकीय प्रयोगशाळेकडून 31 तर खासगी प्रयोशाळेकडून 44 अशा तालुक्यातील एकूण 75 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील 29 तर ग्रामीण क्षेत्रातील 46 जणांचा समावेश आहे. शहरातील गांधी चौक परिसरातील 45 व 20 वर्षीय महिला, जय प्रकाश रोडवरील 23 वर्षीय तरुण, रंगारगल्लीतील 37, 29 व 20 वर्षीय तरुण, अभिनवनगर मधील 16 वर्षीय तरुण, पंपींग स्टेशन जवळील 35 वर्षीय तरुण, गणेश नगरमधील 45 वर्षीय इसम, पद्मनगरमधील 57 वर्षीय इसमासह तीन वर्षीय बालक, विद्यानगर मधील 60 व 49 वर्षीय महिला.
जाणताराजा मैदानाजवळील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वैदुवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जनतानगर मधील 70 वर्षीय महिला, गोविंद नगरमधील 30 वर्षीय तरुणासह 24 वर्षीय महिला, चैतन्य नगरमधील 5 वर्षीय बालिका, इंदिरानगर मधील 42 वर्षीय तरुण, वकील कॉलनीतील 68 वर्षीय महिला, 48 वर्षीय इसम व 18 वर्षीय तरुणी, स्वामी समर्थ नगरमधील 39 वर्षीय तरुण व स्वातंत्र्य चौकातील 30 वर्षीय तरुण अशा शहरातील 29 जणांचा समावेश आहे. तर ग्रामीण क्षेत्रातील रायतेवाडीतील 30 वर्षीय तरुण, डोंगरगावमधील 44 वर्षीय इसम, गुंजाळवाडी शिवारातील रहाणे मळ्यातील 57 वर्षीय इसम, 31 वर्षीय तरुण, 55 आणि 22 वर्षीय महिला, माळेगाव येथील 70 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 40 वर्षीय तरुण, खळीतील 65 वर्षीय महिला, निमगावातील 52 वर्षीय इसम,
वडगाव लांडगा येथील 26 वर्षीय महिला, चणेगावातील 52 वर्षीय इसमासह 45 व 27 वर्षीय महिला, कौठे कमळेश्वर येथील 49 वर्षीय इसम, बोरबन येथील 59 वर्षीय इसम, अमृतनगरमधील 35 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण आणि 6 वर्षीय बालिका, मालपाणीनगर मधील 70 व 65 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 63, 50 व 34 वर्षीय महिलांसह 47 वर्षीय इसम व 42 आणि 32 वर्षीय तरुण, कोकणगाव मधील 89 वर्षीय वयोवृद्ध, वाघापूर येथील 47 वर्षीय इसम, संगमनेर खुर्दमधील 35 वर्षीय तरुणासह 20 वर्षीय तरुणी, समनापूर येथील 45 वर्षीय महिला, तळेगाव दिघेतील 53 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण, पोखरी बाळेश्वर येथील 18 वर्षीय तरुण, मालदाड येथील 59 वर्षीय इसमासह 20 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 28 वर्षीय तरुण, अरगडे मळ्यातील 29 व 26 वर्षीय महिला आणि 34 वर्षीय तरुण, ढोलेवाडीतील 14 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा, मेंढवण येथील 31 वर्षीय तरुण, मिरपूर येथील 30 वर्षीय महिला व पळसखेडे येथील 53 वर्षीय इसम अशा एकूण 75 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या आता 7 हजार 542 वर जावून पोहोचली आहे.
अकोल्यात आढळले 25 रुग्ण..
आज अकोले तालुक्यातही मोठठ्या प्रमाणात रुग्ण समोर आले. त्यात अकाले शहरातील 57 व 53 वर्षीय इसमांसह 27, 24, 20 व 16 वर्षीय तरुण, सातेवाडीतील 17 वर्षीय तरुण, ब्राह्मणवाडा येथील 53 वर्षीय इसम, लिंगदेव येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोतुळ येथील 75 व 49 वर्षीय इसमांसह 26 वर्षीय तरुण, देवठाण येथील 54 वर्षीय महिला, धुमाळवाडीतील 34 वर्षीय तरुण, नवलेवाडीतील 30 वर्षीय महिला, रेडे येथील 45 वर्षीय महिला आणि 24 वर्षीय तरुण, बहिरोबावाडी येथील 29 वर्षीय तरुण, ओतूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, उंचखडक येथील 81 वर्षीय वयोवृद्ध, माळीझाप येथील 21 वर्षीय तरुण, शरणखेड येथील 28 वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथील 65 वर्षीय महिला व बेलापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशा एकूण 25 जणांना कोविडची लागण झाली आहे.
जिल्ह्याची आजची स्थिती..
आजच्या स्थितीत जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 82 हजार 74 झाली असून आजवर जिल्ह्यातील 77 हजार 925 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील 2 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 182 रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. जिल्ह्यात आज 611 रुग्णांची वाढ झालेली असतांना जवळपास त्यापेक्षा निम्म्या म्हणजे 323 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुन्हा खालावले असून सध्या ही सरासरी 94.94 टक्क्यांवर आली आहे.