‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना!’ ठाकरे सरकारचा विखेंनी घेतला खरपूस समाचार!

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच विविध मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोप होवून टीकेचा भडीमार केला जातो. यातच भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विविध विषयांवर ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.


महाआघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराने कळस केला असून हे सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले आहे. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी या सरकारची अवस्था झाली असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच आगामी निवडणुकांबाबत विखे म्हणाले की, आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात श्रीरामपूरात प्रभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांची क्षमता पाहून त्यांना कामाचे आदेश दिले जातील.

तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजपाच्या चिन्हावर तर सहकारी संस्थांच्या निवडणुकींबाबत पुढील महिन्यात बैठक घेऊन कुणाशी युती करायची याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यक्तीद्वेषाच्या राजकारणाने मनोरंजन होते, परंतु संघटनेची बांधणी होणार नाही. तरुण, महिला व बेरोजगार यांना बरोबर घेऊन त्यांच्यात आशावाद निर्माण करावा लागेल. पुढील काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका भाजप म्हणून लढवायच्या आहेत. आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी पुढील महिन्यात गट व गावनिहाय बैठका घेऊन युतीबाबत योग्य वेळ आल्यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Visits: 109 Today: 1 Total: 1098692

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *