गौतम हिरण हत्याकांड; पाच संशयितांना घेतले ताब्यात चौघे नाशिकचे तर एक अन्य ठिकाणचा; खुलासा होण्याची शक्यता

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे. या प्रकरणाची गंभीरता बघता पोलिसांनी शुक्रवारी (ता.12) पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
![]()
दरम्यान, यातील चौघे नाशिकचे आहे. बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे दि. 1 मार्च, 2021 रोजी अपहरण करून त्यांची हत्या केली होती. सात दिवसानंतर त्यांचा मृतदेह वाकडी रस्त्यावरील यशवंतबाबा रेल्वे चौकीजवळ आढळून आला. त्याचदिवशी पोलिसांनी बिट्टू वायकर व सागर गंगावणे यांना अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. काल त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

या गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी चार पथके पाठविण्यात आली होती. त्यात नाशिक येथील चार व अन्य ठिकाणचा एक अशा पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी (ता.13) त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले जाणार असल्याबरोबर प्रकरणाचा खुलासा होण्याचीही शक्यता आहे.
