शनिमंदिर शुक्रवारी व शनिवारी बंद राहणार!

नायक वृत्तसेवा, नेवासा
जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीमुळे शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर शुक्रवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमावस्या यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर व कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली आहे.

शिंगणापूर येथे शनि अमावस्याला देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनि अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता शनि मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. शनिवारी देखील दिवसभर दर्शन बंद राहिल. रविवारी (ता.14) दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू होईल. नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शनिवारी जमावबंदी लागू केली आहे. ग्रामस्थांनी व भाविकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी केले आहे.

Visits: 113 Today: 2 Total: 1108500

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *