संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी 40 कोटींचा निधी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण याकरिता चालू अर्थसंकल्पातून 40 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांकरिता 40 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातून 171 गावे, वाड्या व वस्त्या असलेल्या या मोठ्या विस्ताराच्या तालुक्यात रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहे. याचबरोबर पुणे-नाशिक महामार्गावर दुभाजकासह चौपदरीकरण, सुशोभीकरण त्याचप्रमाणे संगमनेर ते समनापूर महामार्गावर दुभाजकासह चौपदरीकरण यांसह विविध रस्त्यांची कामे होणार आहेत. तसेच पुणे-नाशिक महामार्गावरील अभियांत्रिकी महाविद्यालय व रायते फाटा येथील जंक्शनचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

Visits: 170 Today: 1 Total: 2165220

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *