हातामध्ये तलवार घेऊन फोटो काढणे तरुणाला पडले महागात

हातामध्ये तलवार घेऊन फोटो काढणे तरुणाला पडले महागात
नायक वृत्तसेवा, नेवासा
हातामध्ये तलवार घेऊन फोटो काढून तो समाज माध्यमांवर पसरविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला बुधवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


योगेश शिवाजी चावरे (वय 22, रा.नजीक चिंचोली, ता.नेवासा ) असे या तरुणाचे नाव असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, योगेशने बुधवारी तलवारीसह फोटो काढून ते समाज माध्यमांवर पसरविले होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी दोन पंचासह योगेशच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्याकडे आठ हजार रुपये किंमतीच्या दोन तलवारी सापडल्या. अधिक चौकशी केली असता योगेश या तलवारी विनापरवाना व बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही तलवारी जप्त करत योगेश चावरे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे अधिक तपास करीत आहेत.

Visits: 134 Today: 2 Total: 1113937

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *