तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा
तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील पावबाकी रस्ता येथील अठ्ठावीस वर्षीय तरुणीस वारंवार भेटण्यास बोलावून सतत त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घारगाव येथील एकाविरोधात संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील पावबाकी रस्ता येथील भारती सचिन पावबाके हिला आरोपी सुनील भानुदास फाकटकर याने वारंवार फोन करुन भेटण्याचा तगादा लावला. तसेच धमकी देऊन वारंवार त्रास देत तिचे जगणे असह्य केले. अखेर वैतागलेल्या तरुणीने 18 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान आत्महत्या केली. या प्रकरणी पोपट आप्पासाहेब गाडेकर (वय 30, रा.राहाता) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गु.र.नं. 1899/2020 भादंवि कलम 306, 507 प्रमाणे सुनील फाकटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परदेशी हे करत आहे.

