प्रणिता सोमणला देशपातळीवर ‘उत्कृष्ट खेळाडू’चा बहुमान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सायकलींग खेळामध्ये आपले नैपुण्य दाखविणार्या संगमनेरच्या प्रणिता सोमण हिने कर्नाटक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या स्पर्धेत तीन सुवर्णपदक मिळवून देशपातळीवर ‘उत्कृष्ट खेळाडू’चा बहुमान मिळविला आहे.

कर्नाटक येथील गदग येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत प्रणिता सोमण हिने सायकलींगच्या तीन प्रकाराच्या स्पर्धेत सहभाग घेतला नोंदवला होता. इलाईट टाईम ट्रायल 51 मिनिटे आणि 17 सेकंद, इलाईट मास स्टार्ट 1 तास, आठ मिनिटे आणि टिम रिले या विभागात तिने अतिशय कमी वेळात अंतर पार करुन यश संपादन करून सुवर्णपदक पटकावतानाच भारतातील ‘उत्कृष्ट खेळाडू’चा बहुमान मिळविला. सायकलींग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी मनिंदरपाल सिंग यांच्या हस्ते प्रणिताचा गौरव करण्यात आला. प्रताप जाधव, संजय साठे आणि संजय धोपावरकर यांचे मार्गदर्शन प्रणिताला मिळते. यापूर्वीही राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेवून यश संपादन केले आहे. तसेच 5 ते 7 मार्च दरम्यान मुंबईत होणार्या राष्ट्रीय रोड स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी देखील तिला मिळाली आहे.
