कोपरगावमध्ये पथविक्रेता योजनेतील लाभार्थ्यांना कर्ज वितरण
कोपरगावमध्ये पथविक्रेता योजनेतील लाभार्थ्यांना कर्ज वितरण
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
केंद्र व राज्य शासन नगरविकास विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेने अंत्योदय योजना, राष्ट्रीय उपजीविका अभियान आणि कोपरगाव नगरपालिका यांच्या मार्फत शहरातील पथविक्रेत्यांचे कायम हंगामी व तात्पुरते या स्वरुपातील 1 ऑगस्ट, 2019 ते 31 जानेवारी, 2020 या दरम्यान बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले. याद्वारे एकूण 1 हजार 46 पथविक्रेत्यांच्या नोंदी झाल्या आहेत. यापैकी 451 लाभार्थ्यांनी कर्ज मागणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरले होते. त्यातील 116 लाभार्थ्यांना संबंधित बँकांनी ऑनलाईन पध्दतीने मंजुरी देत प्रत्यक्षात 76 लाभार्थ्यांना नुकतेच प्रत्येकी दहा हजार रुपये कर्जाचे वितरण केले.

टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांना सूक्ष्म पतपुरवठा करण्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकांमार्फत प्रति लाभार्थी दहा हजार रुपये इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कर्जास 7% व्याज अनुदान तसेच लाभार्थ्यांनी नियमित कर्ज फेड केले तर तीन महिन्याला व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गरजूला मिळावा यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्रत्येक लाभार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर कर्जाचे वितरण पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआयबँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांमार्फत करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकरी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, मार्केट विभाग प्रमुख योगेश्वर खैरे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, लेखापाल तुषार नालकर, अभियंते रोहित सोनवणे, समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, राजेंद्र गाढे, चंद्रकांत साठे, महारुद्र गालट, रामनाथ जाधव, मारुती काटे, नीलेश बुचकुले, राजेंद्र शिंदे, पंजाब नॅशनल बँकेचे शंभू शंकर मुडी, रत्नेश सावेनर, बँक ऑफ इंडियाचे शीतल मतकर, सोनाली पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे बी.जे. रंजन प्रसाद, राजेंद्र साबळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे मनोरंजन मोहनती, अखिलेश दराडे आदी उपस्थित होते.

