कर्जदारास अठरा महिने कैदेची शिक्षा

नायक वृत्तसेवा, नेवासा
अहमदनगर येथील श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप. संस्थेचे कर्जदार राम अनिल ठुबे (रा.नेवासा फाटा, ता.नेवासा) यांनी संस्थेस कर्जबाकी पोटी दिलेला धनादेश वटला नाही म्हणून कर्जदार राम ठुबे यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी.आर.दंडे यांनी 18 महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच नुकसान भरपाईपोटी 10 लाख रुपये रक्कम न भरल्यास आणखी सहा महिन्याची कैद शिक्षा ठोठावली आहे. सदरची रक्कम संस्थेस नुकसान भरपाई देण्याचे आदेशात म्हटले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, आरोपी राम ठुबे यांनी श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप. संस्थेकडून 16 लाख रुपये बोअरवेल वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाचे परतफेडीसाठी ठुबे यांनी संस्थेस पाच लाख रुपयांचा धनादेश दिला होता. तो वटला नाही. म्हणून संस्थेने निगोशिएबल इन्स्ट्युमेंट अ‍ॅक्टचे कलम 138 नुसार आरोपी विरुद्ध शाखाधिकारी सुनील पोपट पेहरे यांनी खटला दाखल केला होता. या खटल्यात ठुबे यांनी घेतलेला बचाव न्यायाधिशांनी फेटाळून लावला. फिर्यादी पतसंस्थेतर्फे किशोर राऊत, सौरभ राऊत यांनी काम पाहिले.

Visits: 106 Today: 1 Total: 1116059

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *