‘दर्शन टेक्स्टाईल मार्केट’चा बुधवारी शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील नामांकित पंजाबी बंधूंच्या ‘दर्शन टेक्स्टाईल मार्केट’ या अत्याधुनिक होलसेल वस्त्र दालनाचा बुधवारी सकाळी (ता.17) शुभारंभ होणार असल्याची माहिती दालनाचे प्रमुख इंद्रजीतसिंग (जितू शेठ) पंजाबी यांनी दिली आहे.

पंजाबी परिवारातील ज्येष्ठ सदस्य स्वर्गीय काळूसिंग उर्फ दर्शनसिंग पंजाबी यांच्या कृपाशीर्वादाने तब्बल पन्नास वर्षांपूर्वी प्रथमतः पंजाबी बंधूंनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ‘जितेंद्र’ नावाचे कापड दुकान सुरू केले. अल्पावधीतच उत्तर नगर जिल्ह्यात हे दुकान प्रसिद्ध झाले. विविध नामांकित कंपन्यांची कपडे दर्जेदार आणि माफक दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नेहरू चौकामध्ये नरेंद्र टेक्स्टाईल हे होलसेल कापड दुकान सुरू केले. त्याच्या शेजारीच दर्शन होलसेल आणि सद्गुरु कापड दुकान सुरू केले.

आता शहरातील जाणता राजा मार्गावर होलसेल कापड दुकानाची ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन इंद्रजीतसिंग (जितू शेठ) यांचे चिरंजीव गुरुप्रीतसिंग (रिंपू) पंजाबी यांनी आयडीबीआय बँकेच्या समोर सर्व सुविधांयुक्त अद्ययावत ‘दर्शन टेक्स्टाईल मार्केट’मधून सिल्क डिझायनर साड्या, डिझायनर वनपीस कुर्तीज, लेगिन्स, जीन्स-टॉप, मॅचिंग काउंटर त्याचप्रमाणे पुरुषांसाठी शेरवाणी, इंडो-वेस्टर्न सलवार-कुर्ता, शर्ट-पॅन्ट, टी-शर्ट, सुटींग-शर्टींग, नाईट पँट, बरमुडा आदी विविध कपडे उपलब्ध होणार आहेत. तसेच संगमनेरातील सर्वात मोठा फर्निशिंग विभागही या वस्त्र दालनात राहणार आहे. या दालनाचा शुभारंभ बुधवारी (ता.17) सकाळी 10.30 वाजता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजीत देशमुख व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शुभारंभ होणार आहे. तरी या शुभारंभ सोहळ्यास संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दर्शन टेक्स्टाईलचे प्रमुख इंद्रजीतसिंग (जितू) पंजाबी, गुरुप्रीतसिंग (रिंपू) पंजाबी व पंजाबी बंधूंनी केले आहे.
