संगमनेरात छात्रभारतीचे ‘गाजर दाखवा’ आंदोलन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शिक्षक विनाअनुदानित तत्त्वावर अध्यापनाचे काम करत आहे. राज्यातील आजी-माजी सरकारांनी सातत्याने गाजर दाखविल्याचा आरोप करुन छात्रभारती संघटनेने मंगळवारी (ता.16) दुपारी बारा वाजेच्या सुमारास संगमनेर प्रांत कार्यालयासमोर ‘गाजर दाखवा’ असे अभिनव आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.

विनाअनुदानित धोरणाचा राज्यातील हजारो शिक्षकांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होते. परंतु, अद्यापही आजी-माजी राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. सातत्याने गाजर दाखवत असल्याचा आरोप करुन अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्याचे छात्रभारती संघटनेने निवेदनात म्हटले आहे. आता तरी गेंड्याच्या कातडीच्या सरकारने जागे होऊन लवकरात लवकर अनुदान द्यावे अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना प्रांताधिकार्‍यांकडून पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. या अभिनव आंदोलनात छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुकाध्यक्ष राहुल जर्‍हाड, संघटक ऋषीकेश वाकचौरे, उपाध्यक्ष सोमा फापाळे, कार्यवाह हर्षल कोकणे, सचिव तृप्ती जोर्वेकर, सदस्य शुभम गोर्डे, साहिल जोर्वेकर, सागर गुंजाळ, सानिया शिंदे, साहिल जोर्वेकर, डोंगरे सर, गोपीनाथ घुले आदी उपस्थित होते.

Visits: 138 Today: 1 Total: 1580234

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *