पेंडशेत येथील गवळीबाबा मंदिरात चोरी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याच्या दुर्गम भागातील पेंडशेत येथील गवळीबाबा मंदिरातून चांदीचे देव आणि मुकुटाची शुक्रवारी (ता.12) चोरी झाली आहे. या प्रकरणी राजूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुजारी काळू तुकाराम वळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी पहाटे पाच वाजता पूजेसाठी मंदिरात गेलो. मंदिरातील गवळीबाबांची पूजा केली. त्यानंतर मंदिरातील चांदीपासून बनविण्यात आलेल्या खंडोबा, वाघोबा, शंकर आणि कळसूबाई यांची पूजा करून त्या मंदिराच्या ओसरीवर ठेवून फेरी करण्यास गावात गेलो. परत मंदिरात आरती-पुजेसाठी आलो असता ओसरीवर ठेवलेले चांदीचे देव आणि गवळीबाबांचा 250 ग्रॅम वजनाचा मुकुट गायब झाल्याचे दिसून आले. ही बाब तत्काळ ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. यावरुन राजूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार बी. डी. आघाव हे करत आहे.

Visits: 187 Today: 1 Total: 2122145

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *