युवक क्रांती संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

नायक वृत्तसेवा, अकोले
युवक क्रांती संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा विस्तार शुक्रवारी (ता.12) अकोले सोसायटी सभागृहात झालेल्या संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. संघटना गेली आठ वर्षांपासून तालुक्यात सामाजिक काम करत असून अनेक समाजोपयोगी उपक्रम संघटनेने राबवले आहेत. अशा प्राप्त परिस्थितीत संघटनेने तालुका स्तरावर नव्या कार्यकारिणीचा विस्तार जाहीर केला आहे. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, सहा उपाध्यक्ष, तीन विभाग अध्यक्ष, एक मुख्य संघटक व एक प्रवक्ता अशा पदांचा समावेश आहे.

यावेळी युवक क्रांती संघटनेचे संस्थापक विनोद हांडे अध्यक्षस्थानी होते. नेहमीच तात्विक, वैचारिक भूमिकेवर काम करत असलेल्या आणि सामाजिक कामाची आवड असणार्या अनेक युवकांनी संघटनेचे सभासदत्व घेतले आहे. तालुक्याच्या मुळा, प्रवरा व आढळा या तिन्ही विभागातून मोठ्या प्रमाणावर युवक संघटनेत सहभागी झाले असून शेकडो कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली आहे. अध्यक्ष लक्ष्मण शेळके, कार्याध्यक्ष गणेश कोकणे, सचिव रामनाथ शिंदे, सरचिटणीस दत्ता धुमाळ, प्रवक्ता अशोक राक्षे, मुख्य संघटक कृष्णा हासे, उपाध्यक्ष रोहित हासे, संदीप तोरमल, महेश पोखरकर, गोरख कदम, भरत सहाणे, नवनाथ पांडे, भाऊसाहेब तळेकर. प्रवरा विभागाचे अध्यक्ष डॉ.सचिन गुंजाळ, आढळा विभाग अध्यक्ष प्रशांत भालेराव, मुळा विभाग अध्यक्ष प्रवीण यादव, अकोले शहराध्यक्ष बापू चौधरी, उपाध्यक्ष आत्माराम चौधरी, कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य डॉ.रामहरी चौधरी, सादिक इनामदार, संदीप लगड, संतोष तिकांडे, भूषण सदगीर, मदन एखंडे, राजाराम कासार, विठ्ठल दातखिळे, मनोज चौधरी, विकास हासे, विठ्ठल वाळुंज, संदीप भोर, अजित आवारी, अशोक वाकचौरे, जितेंद्र मुंडे आदिंची नियुक्ती करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारिणीला संघटनेचे माजी अध्यक्ष विकास बंगाळ, संस्थापक विनोद हांडे यांसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
