सुनील गडाखांच्या प्रयत्नांतून महादेव देवस्थान ‘क’ वर्गात ग्रामस्थांसह देवस्थानच्यावतीने सोनईमध्ये यथोचित सन्मान

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील मुळाथडी परिसरातील पानेगाव तसेच पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणारे महादेव मंदिर अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या प्रयत्नातून ‘क’ वर्गात समाविष्ट करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांसह महादेव देवस्थान ट्रस्टच्यावतीने सोनई येथे सभापती गडाख यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे संचालक तथा सरपंच संजय जंगले होते. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सभापती गडाख म्हणाले, काम करणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता कधीच कमी पडून देणार नसून आपण सर्वांनी विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष जंगले म्हणाले, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख झाल्यापासून मुळाथडी परिसराबरोबरच पानेगावला नेहमीच झुकते माप मिळाले असून मोठ्या प्रमाणावर गावचा विकास झाला. तर उर्वरित विकासासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गडाख यांनी निधी मंजूर केला असून आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी आहोत. महादेव देवस्थानचे सचिव किशोर जंगले म्हणाले, सुरुवातीपासून सभापती गडाख हे ट्रस्ट करण्यासाठी आग्रही भूमिका घेत होते. आज खर्‍या अर्थाने ‘क’ वर्गात समाविष्ट झाल्याने निश्चितच आम्हांला आनंद होत आहे.

जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे म्हणाले, पंगतीत वाढणारा आपला माणूस असला तर निश्चितपणे पोट भरुन जेवायला मिळते असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नेहमी सांगतात. त्याच पद्धतीचे काम आज तालुक्यात व जिल्ह्यात सभापती आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख बंधूंचे सुरू आहे. या कार्यक्रमास मुळा साखर कारखान्याचे संचालक रंगनाथ जंगले, खरेदी-विक्री संघाचे संचालक जालिंदर जंगले, महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ जंगले, पानेगाव संस्थेचे उपाध्यक्ष अशोक गागरे, विठ्ठल गागरे, जगन्नाथ जंगले, गुडधे महाराज, राजेंद्र जंगले, बबन जंगले, अनिल जंगले, जनार्दन गागरे, भारत जंगले, बाबासाहेब गुडधे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, भाऊसाहेब काकडे, रमेश गुडधे, बाळासाहेब जंगले, ताराचंद घोलप, सतीश जंगले, संजय वाघमारे, संजय पवार, तानाजी गायकवाड, डॉ.काकडे, ज्ञानेश्वर जंगले, नामदेव गुडधे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप जंगले यांनी केले तर आभार तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप यांनी मानले.

Visits: 131 Today: 1 Total: 1100503

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *