संत रविदास महाराजांचे कार्य जगाला दिशादर्शक ः सुखदेव महाराज शिर्डी येथे चर्मकार समाजाचे राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर उत्साहात

नायक वृत्तसेवा, राहाता
संत रविदास महाराज यांनी समता, अंधश्रद्धा व कर्मकांडाविषयी जागरणाचे केलेले कार्य समाजासह जगाला दिशादर्शक असल्याचे मत अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटनचे सुखदेव महाराज यांनी केले.

चर्मकार विकास संघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर नुकतेच शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी महाराज बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व संत रविदास महाराज यांच्या आरतीने झाले.
![]()
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार लोखंडे म्हणाले, चर्मकार समाजाने विविध उद्योग व्यवसायासह विकास करताना जनमाणसांत बंधुभाव जपण्यासाठी योगदान दिले आहे. संजय खामकर यांच्या नेतृत्वात चर्मकार विकास संघाने राज्यस्तरीय पदाधिकार्यांचे शिबिर आयोजित करून कार्यकर्त्यांना समाजात दिशादर्शक कार्य करण्यासाठी विविध विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले आहे. या शिबिरातून कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम प्रशिक्षण मिळेल असा आशावाद व्यक्त करुन मुंबईत चर्मकार समाजाचे भव्य वसतिगृह व प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

मानद व्याख्याते विठ्ठल बुलबुले यांनी माहितीच्या अधिकाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अनंत लोखंडे यांनी आचारसंहिता व अनुशासन पाळून समाजहितासाठी काम करण्याचे आवाहन केले. चर्मकार विकास संघाचे कायदेविषयक मार्गदर्शक अॅड.नारायण गायकवाड यांनी अनुसूचित जाती-जमाती संरक्षण कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. विजयकुमार सरोदे यांनी वाहन संरक्षण व अपघातांविषयी मार्गदर्शन केले. संस्थापक व प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी युवकांना संघटनेच्या कार्याची माहिती देत समाजाने एकत्रितपणे विकासासाठी व न्यायहक्कांकरिता लढण्याचे आवाहन केले.

या शिबिरास अभिनेता काळूराम ढोबळे, रामदास सोनवणे, कारभारी देव्हारे, हरिभाऊ बावस्कर, दिनेश देवरे, स्वाती सौदागर, प्रतिभा खामकर उपस्थित होते. मुंबई विभाग प्रदेशाध्यक्ष यांनी प्रस्तावना केली. प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश माने, मुंबई अध्यक्षा प्रियांका गजरे, पुणे कार्याध्यक्ष महेंद्र साळवे, नीलेश झरेकर, सयाजी पवार, संतोष कांबळे, अमर झिंजुर्डे, शिवाजी पाचोरे, वैभव खैरे, नीलेश आंबेडकर, संजय गुजर, अमोल डोळस, संदीप डोळस, सिमोन जगताप, अॅड.अविनाश शेजवळ, नीलेश साबळे यांनी शिबिराचे व्यवस्थापन केले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी केले. जगन्नाथ खामकर, अशोक बोर्हाडे, संगीता वाकचौरे, वंदना कांबळे, किरण घनदाट, संतोष लोहकरे, विनायक कानडे, संतोष खैरे, वैभव खैरे, अण्णा खैरे, दत्तात्रय खामकर, विशाल पोटे, रंगनाथ कानडे, विवेक झरेकर, अमोल वाघमारे, रवींद्र सातपुते, संजय बनसोड, दत्तात्रय ढवळे, सचिन सुरसे, अशोक वाघमारे आदिंनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
