‘सर्वोदय’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन शाह

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील सहकारात अग्रगण्य असणार्‍या सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन येवंतीलाल शाह यांची नुकतीच तालुका उपनिबंधक पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवड करण्यात आली आहे.

अध्यक्षपदासाठी सचिन शाह यांच्या नावाची सूचना संस्थेचे संचालक सुरेश शाह यांनी मांडली. त्यास संचालक कल्पेश मेहता यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष महेश कटारिया, सचिन बिपीनचंद्र शाह, संचालक शैलेंद्र ओहरा, दर्शन मेहता, वैभव शाह, शरद ओहरा, सुभाष शाह, संकेत शाह, राजेश दोशी, आशिष शाह, राजेंद्र काळे, नितीन भागवत, अरुण नारायणे, श्वेता मेहता, राखी शाह, व्यवस्थापक व कार्यलक्षी संचालक मधुकर वनम, सहाय्यक व्यवस्थापक राजेश ढगे उपस्थित होते. नूतन अध्यक्ष शाह यांनी निवडीबद्दल सर्व संचालकांचे आभार मानून सर्वांना बरोबर घेवून संस्थेच्या प्रगतीसाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Visits: 387 Today: 1 Total: 2168992

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *