संगमनेर पालिकेची थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील पालिका हद्दीतील मालमत्ता व इतर करांच्या थकबाकीमुळे मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी दिली आहे.

सन 2020-2021 मधील मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली करण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने मुख्याधिकारी डॉ.बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सहा. कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, कर विभाग प्रमुख योगेश मुळे आणि कर्मचार्‍यांच्या सहभागी पथकाने ही धडक मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. शहरातील कुरण रस्ता, अन्सार नगर भागातील मोहम्मद रशीद अन्सारी, नवीन नगर रस्ता भागातील रिलायन्स जिओ इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हेवाडी रस्ता भागातील रिलायन्स जिओ इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालमत्ता कराची 5 लाख 56 हजार 994 रुपये थकबाकी पोटी संबंधित थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर करांची वसुली करण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने विशेष वसुली मोहीम सुरू केली असून थकबाकी असणार्‍यांनी तत्काळ थकबाकी भरुन संभाव्य कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.बांगर यांनी केले आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 115954

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *