गावठी कट्टा व काडतुसांसह दोघांना पोलिसांनी पकडले

नायक वृत्तसेवा, शेवगाव
गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह एका आरोपीस व एका अल्पवयीन मुलास शेवगाव पोलिसांनी सोमवारी (ता.8) पकडले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोनोशीवरून नांदूरकडे जाणार्‍या रस्त्यावरील खंडोबा मंदिर जवळील लिंबाच्या झाडाखाली बाबासाहेब दादाबा ढाकणे (वय 27, रा.भारजवाडी, ता.पाथर्डी) व एका अल्पवयीन मुलास गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह पोलिसांच्या पथकाने पकडले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, मुख्य हवालदार भगवान बडधे, दिलीप राठोड, राजू ढाकणे, भानाजी काळोखे व गणगे यांनी केली. या प्रकरणी पोलीस शिपाई भानाजी काळोखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी बाबासाहेब ढाकणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visits: 177 Today: 1 Total: 2057620

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *