‘ओएलएक्स’ची जाहिरात केंद्र सरकारच्या धोरणातही दिसू लागली! खासदार डॉ.अमोल कोल्हेंचा लोकसभेत सरकारवर जोरदार निशाणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था
मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या धोरणांची तुलना ‘ओएलएक्स’ कंपनीशी केली आहे. ओएलएक्सची जाहीरात सरकारी धोरणांत दिसू लागली आहे, अशा शब्दांत कोल्हेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. लोकसभेत ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. ओएलएक्स या ई-कॉमर्स कंपनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही वस्तूची खरेदी-विक्री करता येते.

खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आम्हाला ‘आत्मनिर्भर भारत’ हा एक चांगला शब्द ऐकायला मिळाला. जेव्हा आम्ही सर्वांनी देश को बिकने नहीं दूँगा हे ऐकलं होतं तेव्हा आम्हाला अभिमान वाटला होता. पण त्यानंतर मात्र ओएलएक्सची जाहिरात जास्तच प्रभावी झाली आणि ती धोरणांतही दिसू लागली. जे आहे ते विकून टाकण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. त्यामुळे आता भीती वाटतेय की हे सरकार आत्मनिर्भर भारताची उभारणी करतंय की ‘मुठभर पुँजीपती निर्भर’ भारताची?

मी या सरकारला सांगू इच्छितो की, जर अशाप्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेच्या पदराआड लपून केंद्र सरकार सत्तेच्या मागे-पुढे करणार्‍या मुठभर भांडवलदारांना या देशाची संपत्ती विकून टाकणार असेल तर भावी पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत, असा इशाराही खासदार कोल्हे यांनी मोदी सरकारला दिला आहे.

Visits: 85 Today: 1 Total: 1113793

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *