उद्योजक मेहेरांकडून राम मंदिरासाठी 51 हजारांची देणगी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी संगमनेर येथील उद्योजक शिवाजी मेहेर यांनी हॉटेल उद्योग समूहाच्यावतीने 51 हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश नुकताच श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाच्या सदस्यांकडे सुपूर्द केला आहे.

श्रीराम मंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी नुकताच संगमनेरचा दौरा करुन अयोध्येत होत भव्य दिव्य स्वरुपात होणार्या श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी यथाशक्ती सढळ हाताने मदत करा असे आवाहन केले आहे. त्यास संगमनेरकर उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. अनेक रामभक्तांनी मंदिराच्या उभारणीसाठी यथाशक्ती देणगी देत खारीचा वाटा उचललेला आहे. सदर धनादेश देतेवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह तालुका संघचालक सुभाष कोथमिरे, निधी संकलन अभियानाचे सदस्य, हॉटेल ग्रीन पार्कचे प्रमुख तथा उद्योजक शिवाजी मेहेर, हॉटेल अंबरचे तुळशीराम भगत, हॉटेल ग्रीन पार्कचे समरेंद्र सेठ्ठी, हॉटेल श्री सागरचे मुक्तीकांत नायक आदी उपस्थित होते.
