सरपंच-उपसरपंच पदासाठी 9 व 10 फेब्रुवारीला सभा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक दिवसांपासून गावचा कारभारी कोण होणार याची उत्सुकता ताणलेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी पहिली सभा 9 आणि 10 फेब्रुवारी होणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी मतदान झाले. त्याचा निकाल 18 जानेवारीला लागला. त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावचा कारभारी कोण होणार याची उत्सुकता ताणली असतानाच येत्या 9 आणि 10 तारखेला सरपंच आणि उपसरपंच पदासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. या सभेसाठी शासनाच्या कोविडबाबत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, सभा आयोजित केल्याची नोटीस नवनिर्वाचित सदस्यांना सभेच्या तीन दिवस अगोदर देण्याची व्यवस्था करण्याबाबत अध्यासी अधिकार्‍यांना आदेश द्यावेत आणि इतिवृत्तासह तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी संबंधित तहसीलदारांना निर्गमित केले आहेत.

Visits: 97 Today: 1 Total: 1098994

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *