संपामुळे अकोले आगाराला सुमारे दोन कोटींचा फटका! शासनाने वेतनवाढ करुनही कर्मचारी विलिनीरकणावर ठाम

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कामगारांच्या संपामुळे ‘लालपरी’ची चाके थांबलेली आहेत. सध्या काही आगार सुरू झाले असले तरी काही बाकी आहेत. या संपात अकोले आगारातील कर्मचारी देखील सहभागी असल्याने आगाराला सुमारे दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

8 नोव्हेंबरपासून अकोले एसटी आगाराचे कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे ग्रामीण भागासह बाहेर जाणार्‍या सर्व फेर्‍या बंद आहेत. सर्वच बसेस अकोले आगारात उभ्या आहेत. एक महिना उलटला तरी संप न मिटल्याने आगाराचे दोन कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांपैकी काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

अकोले आगारातील 253 कर्मचारी संपावर असून, यातील 27 कर्मचारी निलंबित करण्यात आले, तर आठ कर्मचार्‍यांना बडतर्फ केले आहे. चार कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर आव्हाड यांनी सांगितले. याचबरोबर आगारातील चाळीस प्रवासी बसेस आहेत, तर 6 मालवाहतूक बसेस आहेत. परंतु, गेल्या महिनाभरापासून त्या देखील उभ्या आहेत.

अकोले आगारात 103 वाहक, 86 चालक आणि 38 मेकॅनिक आहेत. ते सर्व संपावर असल्याने मालवाहतूक आणि प्रवासी गाड्या उभ्या आहेत. यामुळे परिवहन मंडळाच्या अकोले आगाराला दररोज किमान चार लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. याव्यतिरिक्त दिवाळीमध्ये दररोज सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्नही बुडाले आहे.

Visits: 5 Today: 2 Total: 23114

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *