सुखदान यांच्याकडून पोलीस अधिकार्‍याचे पितळ उघडे…!

सुखदान यांच्याकडून पोलीस अधिकार्‍याचे पितळ उघडे…!
नायक वृत्तसेवा, नेवासा
वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय सुखदान यांनी गुरुवारी (ता.17) सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून नेवासा पोलीस ठाण्याच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकार्‍याचे पितळ उघडे पाडल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.


गेल्या आठ दिवसांपूर्वी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे हे एका रस्तालूट प्रकरणात चोरांना पकडताना झटापटीत जखमी झाल्याने ते रजेवर गेले. त्यानंतर त्यांच्या जागी सध्या पोलीस ठाण्याचे काम प्रभारी म्हणून एका सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असणार्‍या अधिकार्‍याकडे देण्यात आले आहे. मात्र गेल्या दहा दिवसांत शहरात व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे, क्लब, शेळ्या चोरांना सोडून देण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप संजय सुखदान यांनी फेसबुकवर लाईव्ह क्लिपद्वारे केला होता. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याची चर्चाही शहरात रंगत आहे. सदर प्रकार कितपत खरा आहे हे योग्यवेळी उजेडात येईल. परंतु सुखदान यांच्याकडे ठोस पुरावे असल्याचे सांगण्यात आहे. तरी सदर प्रकाराची योग्य चौकशी वरीष्ठ अधिकार्‍यांनी करावी अशी मागणी सामान्य जनतेतून जोर धरत आहे.

सध्या राज्यात ठाकरे तर नेवाशात ठाकूर…
नेवासा पोलीस ठाण्यात व शहरात सध्या प्रभारी राज गोरगरिबांना ज्या-ज्या वेळी मदत लागेल त्यावेळी डॉ.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेचे प्रश्न मार्गी लावत असतो. पोलीस यंत्रणेला आमचे नेहमी सहकार्य करण्याची भूमिका असते आणि येथून पुढेही राहणार. मात्र सध्या ‘मेरा आवाज सुनो’ असा केविलवाणा प्रकार पोलीस ठाण्यात सुरू आहे.
– संजय सुखदान (युवा नेते, वंचित बहुजन आघाडी)

Visits: 145 Today: 2 Total: 1596358

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *