पठारभागातील शिवसैनिकांचे घारगाव पोलिसांना निवेदन

नायक वृत्तसेवा, घारगाव
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटत असतानाच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शिवसैनिकांनी घारगाव पोलिसांना निवेदन देत मंत्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

बुधवारी (ता.25) शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनावर शिवसेना तालुका संघटक दिलीप साळगट, उपतालुकाप्रमुख अमित फटांगरे, दत्ताभाऊ गाडेकर, रंगनाथ फटांगरे, भाऊसाहेब साळगट, डॉक्टर आदित्य साळगट, बाळासाहेब धुमाळ, सतीष भुजबळ, तान्हाजी गोंदे, रामचंद्र फटांगरे, दत्ता गोडे, बाळासाहेब लेंडे आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. तत्पूर्वी शिवसैनिक मंत्री राणे यांचा पुतळा जाळून निषेध करणार होते. मात्र, याची पोलिसांना कुणकुण लागताच त्यांना मनाई केली. त्यानंतर वरीष्ठांशी चर्चा करुन गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक पाटील यांनी शिवसैनिकांना दिले.

Visits: 168 Today: 1 Total: 2168550

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *