वांबोरीतील सात जणांवर गुन्हा
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर एकत्र येत मिरवणूक काढून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वांबोरीतील सात जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
पोलीस कर्मचारी बराटे यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, तुषार संभाजी मोरे, नवनाथ गवते, किसन जवरे, गोरख देवकर, स्वर कुसमुडे, गोरख ढवळे व प्रशांत नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस शिपाई बराटे हे करत आहेत.
Visits: 12 Today: 1 Total: 153598